विशेष प्रतिनिधी
भोपाळ : देशभरात अनेक ठिकाणी संत रविदास जयंती साजरी झाली. मात्र, मध्य प्रदेशात भाजपचे राज्यसभा खासदार सुमेरसिंह सोलंकी यांनी अनोख्या पध्दतीने जयंती साजरी केली. अनेक वषार्पासून ओळखत असलेल्या एका मोचीची त्यांनी आज भेट घेतली. एवढंच नाही तर त्यांनी त्याच्या चपलांना पॉलिश करुन दिले आहे.BJP MP avoids rhetoric, pays homage to saint Ravidas, polishes cobbler’s slippers
भाजपच्या सुमेरसिंग सोलंकी यांनी मध्य प्रदेशातील बरवानी येथे संत रविदास जयंती एका मोचीसोबत साजरी केली. आज सकाळी खासदार सोळंकी हे बरवणी शहरातील मोती माता चौकात पोहोचले आणि चपला पॉलिश करणाºया मोची देवजीराम यांच्याजवळ जाऊन बसले.
देवजीराम यांची प्रकृती जाणून घेतल्यानंतर सोलंकी यांनी विद्यार्थीदशेत ते त्यांच्याकडून बूट, चप्पल दुरुस्त करून घ्यायचे अशी आठवण करून दिली. त्यानंतर सोळंकी यांनी त्यांना फुलांचा हार घालत चपलांना पॉलिश करून दिले.
यावेळी ते म्हणाले, मी विद्यार्थीदशेत असताना यांच्याकडून चपला दुरुस्त करून घेण्यासाठी येत होतो. त्यामुळे त्या दिवसांच्या आठवणी म्हणून देवजीराम यांच्याकडू जाऊन त्यांनी रविदास जयंती साजरी केली. ते मला विसरले असतील
पण आज रविदास जयंतीच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी केलेल्या सेवेबद्दल आभार मानले. विद्यार्थीदशेत ते आमचे बुट पॉलिश करायचे, आज मी त्यांचे चपलांना पॉलिश केले त्यामुळे मला मन:शांती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App