1984 मध्ये देशाची राजधानी दिल्लीत उसळलेल्या भीषण दंगलीत शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Aparajita Sarangi भाजप खासदार अपराजिता सारंगी यांनी संसद भवन संकुलात प्रियंका गांधी यांना ‘1984 के दंगे’ लिहिलेली बॅग दिली. या बॅगेवर दंगलीचे चित्र होते. अपराजिता यांनी बॅग प्रियांका गांधींकडे देवू केली तेव्हा त्यांनी ती स्वतःकडे ठेवली. ही बॅग पहिल्या नजरेत 1984 च्या दंगलीची आठवण करून देते. 1984 मध्ये देशाची राजधानी दिल्लीत उसळलेल्या भीषण दंगलीत शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.Aparajita Sarangi
प्रियांका गांधी सध्या आपल्या नवनवीन बॅगमुळे चर्चेत आहेत. त्या सतत नवीन बॅग घेऊन संसद भवनात पोहोचतात. त्यांच्या बॅगेवर काही नवीन स्लोगनही लिहिलेले आहेत. कधी अदानी, कधी बांगलादेश तर कधी पॅलेस्टाईन लिहिलेली बॅग हेडलाईन्स बनवत आहेत. दरम्यान, आज भाजप खासदार अपराजिता सारंगी यांनी त्यांना 1984 च्या दंगलीची आठवण करून देणारी बॅग दिली.
अपराजिता सारंगी यांनी प्रियंका गांधी यांना दिलेल्या बॅगेवर ‘1984 के दंगे’ लिहिले आहे. ही बॅग 1984 च्या दंगलीची आठवण करून देणारी आहे. अपराजिता म्हणाल्या की, त्या संसदेत नवीन बॅग आणतात, म्हणून मी त्यांना बॅग गिफ्ट करण्याचा विचारही केला. ही बॅग 1984 च्या दंगलीची आठवण करून देणारी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App