वृत्तसंस्था
कोलकता : भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा दावा केला आहे. याआधी आठ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरासमोर किमान तीन गावठी बॉम्ब फेकण्यात आले होते. BJP MP accuses TMC for bomb attack
या प्रकरणाची चौकशी एनआयए सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आपल्यावर दबाव टाकण्यासाठी आणखी हल्ले केले जात आहेत, असा आरोप अर्जुन यांनी केला. अर्जुन यांनी या हल्ल्याबद्दल सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. तृणमूल आणि पश्चिम बंगाल पोलिसांकडून अभय मिळत असल्याने गुन्हेगारांना भीती वाटत नाही. ते मोकाट फिरतात. पोलिस हे तर तृणमूलचे दादा बनले आहेत. मला अशा हल्ल्यांची कधीही भीती वाटत नाही आणि मी घाबरणार नाही.
तृणमूलचे नेते पार्थ भौमिक यांनी हा आरोप फेटाळून लावला. अर्जुन आणि त्यांच्या लोकांनीच हा कट आखल्याचा दावा त्यांनी केला. बॉम्ब फेकण्यात आले नाहीत, तर ते जेथे ठेवले होते तेथे फुटले असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App