विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात निवडणुकांचे प्रत्यक्ष घमासान सुरू होण्यापूर्वी राजकीय पक्षांनी जे दावे – प्रतिदावे केले आहेत, त्यातून काही वेगळे संकेत मिळत आहेत. भाजपने मिशन 150 असे ब्रीदवाक्य ठेवत आज पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक ठेवली असताना भाजप भाकऱ्या फिरवणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याच वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजप संदर्भात एक समान दावा केला आहे. भाजपचे महाराष्ट्रात 60 आमदार निवडून येतील, असा या दोघांचाही दावा आहे. BJP mission 150 : but jayant patil and Sanjay Raut wants to pull it down to 60, why??
भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कमळ चिन्हावर 150 जागा निवडून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये कमळ चिन्हावर भाजपने 100 पेक्षा जास्त आमदार निवडूनही आणले आहेत. अर्थातच त्यापलीकडे झेप घेण्यासाठी भाजपने मिशन 150 ठेवले आहे, पण जयंत पाटील यांनी आज निवडणुका झाल्या तर भाजपच्या तिकिटावर 60 आमदार निवडून येतील, असा दावा केला. त्यालाच संजय राऊत यांनी वेगळ्या भाषेत दुजोरा दिला. भाजप मिशन 150 कसले ठेवतोय? आम्ही त्यांना 60 वर आऊट करू, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
60 आकड्याचे आकर्षक
जयंत पाटील आणि संजय राऊत यांना भलतेच आकर्षण दिसते आहे, ते आकर्षण ते दोघे असलेल्या राजकीय पक्षांच्या निवडणूक कर्तृत्वातून पुढे आले आहे 60 म्हणजे डबल डिजिट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत कधीच डबल डिजिटचा आकडा ओलांडू शकलेले नाहीत. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही युती असल्याने शिवसेना – भाजप युती असल्याने शिवसेनेला 171 जागा लढवूनही 69 पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत. 2014 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी भाजपची फारकत घेऊन लढवलेल्या निवडणुकीत 63 आमदार निवडून आणले होते.
60 रेंजचे राजकीय मिसाईल
जे शिवसेनेचे त्यापेक्षाही खालचा स्तर राष्ट्रवादीचा. 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 72 आमदार निवडून आणले होते. हा आकडा राष्ट्रवादीचा अंतिम आकडा आहे. त्यानंतर राष्ट्रवादी प्रत्येक निवडणुकीत घसरली. 2014 ला 42 आणि 2019 ला 53 हा राष्ट्रवादीच्या आमदारांचा आकडा आहे. 1990 च्या दशकात जेव्हा शरद पवारांचे राजकारण एकदम फॉर्म मध्ये होते तेव्हाही मुंबईतील विधिमंडळाच्या वर्तुळात शरद पवार हे 60 किलोमीटरची रेंज असणारे राजकीय मिसाईल आहेत, असे बोलले जायचे. त्या पलीकडे शरद पवार नावाच्या राजकीय मिसाईलचा टप्पा पडतच नाही, असे सांगितले जायचे.
1990 चे दशक संपून 30 वर्षे गेली आहेत, तरी शरद पवार नावाच्या राजकीय मिसाईलचा रेंज 60 पर्यंतच तर सोडाच, त्याच्या अलीकडेच पडलेली दिसली आहे. त्यातून कदाचित जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या 60 या आकड्याचे आकर्षण तयार झाले असावे आणि म्हणून त्यांना भाजपला 60 आमदारांच्या आकड्यावर रोखायचे असावे.
शिवसेना – राष्ट्रवादीचे मिशन 100
शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपापले मिशन 100 ठेवले आहे. याचा अर्थ दोन्ही पक्षांना स्वबळावर 145 हा महाराष्ट्र विधानसभेतला बहुमताचा आकडाही ओलांडायचा नाही. 100 आमदार निवडून आणण्याचे ध्येय ठेवून त्यांना ट्रिपल डिजिटलला फक्त स्पर्श करायचा, हे यांचे मूळ ध्येय आहे. त्यामुळे भाजपला जयंत पाटील आणि संजय राऊत हे 60 आमदारांवरच रोखणार असतील, तर ती त्यांची मूलभूत डबल डिजिट तोकडी राजकीय बौद्धिक मर्यादा आहे, असेच म्हणावे लागेल!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App