विशेष प्रतिनिधी
इंदूर : BJP Minister Vijay Shah ऑपरेशन सिंदूरसारख्या ऐतिहासिक मोहिमेची जगासमोर माहिती मांडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या भाषणातील धर्माचा उल्लेख करत केलेल्या अभद्र टिप्पणीमुळे देशभरात टीकेची लाट उसळली आहे.BJP Minister Vijay Shah
रविवारी इंदूर जिल्ह्यातील रायकुंडा गावात एका कार्यक्रमात बोलताना विजय शाह यांनी असे विधान केले की, आमच्या बहिणींचं कुंकु ज्यांनी पुसलं, त्या कटे पिटे लोकांसाठी आम्ही त्यांचीच बहिण पाठवून त्यांची ऐशीच्या तेसी केली. दहशतवाद्चांचे कपडे काढून त्यांनी आमच्या हिंदू बांधवांना मारलं. पण मोदी तर त्यांचे कपडे काढू शकत नाही. पण त्यांच्या बहिणीने त्यांची ऐशीच्या तेसी करण्यासाठी आपल्याकडील विमानं तिकडे पाठवली. मोदी त्यांचे कपडे तर काढू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या समाजाची बहिण त्यांच्याकडे पाठवली, त्यांनी आपल्या बहिणींना विधवा केलं होतं, पण त्यांच्या समाजाच्या बहिणीनंं येईन त्यांना धडा शिकवला.
या विधानात त्यांनी थेट कर्नल सोफिया कुरेशी यांच्या धर्माचा संदर्भ देत त्यांच्या योगदानाचं गौरव करताना इतर समाजाबाबत अवमानकारक भाषा वापरली. यामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कर्नल सोफिया कुरेशी या केवळ भारताच्या लष्करातील एक अधिकारी नाहीत, तर सध्या त्या महिला सक्षमीकरण, धर्मनिरपेक्षता आणि देशभक्तीचे प्रतीक मानल्या जात आहेत. ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर ठामपणे मांडली होती, ज्याचे व्यापक कौतुक झाले होते.
विजय शाह यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या पक्षावरही दबाव निर्माण झाला आहे. विरोधकांनी यावरून भाजपवर ‘धार्मिक द्वेष पसरवण्याचा’ आरोप केला असून, “ही केवळ स्त्रीविरोधी नव्हे, तर धर्माधारित अपमानाची एक घृणास्पद पातळी आहे,” अशा शब्दांत टीका करण्यात येत आहे.
वाद वाढल्याचे लक्षात आल्यानंतर विजय शाह यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, “माझ्या भाषणाचा हेतू कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो.”
तथापि, यावरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया सुरूच आहेत. अनेकांनी मागणी केली आहे की, अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई व्हावी आणि महिला अधिकाऱ्यांचा आदर राखला जावा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App