जुन्या एनडीएच्या पुनरुज्जीवनासाठी वाजपेयी स्मृतिदिनाचा राजकीय मुहूर्त; आकड्यापेक्षा सर्वसमावेशक नेतृत्वावर मोदींचा भर!!

शेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुका लढविण्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने फार मोठ्या हालचाली सुरू असताना भाजपने आपली सर्वसमावेशकता सिद्ध करण्यासाठी वाजपेयी काळातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने पक्षातील वरिष्ठ वर्तुळातून अतिशय गंभीर प्रयत्न सुरू आहेत. 16 ऑगस्ट वाजपेयी स्मृतिदिनाचा राजकीय मुहूर्त त्यासाठी निवडण्यात येणार असल्याची दिल्लीच्या दिल्लीतील पक्षांतर्गत सूत्रांची माहिती आहे. ती देखील वाजपेयींच्या काळातील एनडीए ला 25 वर्षे होत असताना!!BJP looks to bring old allies on board for 25 years of NDA

साधारण 15 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी भाजप आणि मित्र पक्ष यांच्या संबंधांवर विशेषत्वाने भर देणारे भाष्य केले होते. त्या संदर्भातल्या माध्यमांमधल्या बातम्या आकडेमोडी संदर्भातल्या आल्या होत्या. भाजप लोकसभा निवडणुकीत आपला इच्छित आकडा गाठण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पुनरुज्जीवन करीत असल्याचे त्या बातम्यांमध्ये नमूद केले होते.



पण त्यापलीकडे जाऊन भाजपला मोदींच्या नेतृत्वाखाली स्वतःचा विस्तार करतानाच आपण वाजपेयींच्या काळातल्या बहुपक्षीय लोकशाहीवर विश्वास ठेवून देशाची वाटचाल हिंदुत्वाकडे करू शकतो हे दाखवायचे आहे.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर बहुमत मिळवले तरी देखील भाजप मित्र पक्षांना दूर लोटत नाही, तर त्यांच्याशी जुळवून घेऊनच राजकीय वाटचाल करतो हे यातून दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.

या दृष्टिकोनातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप आणि मित्र पक्ष यांच्यातील व्यापक विस्तृत आणि खोलवरच्या संबंधांबाबत विशेष टिपण्णी केली होती. आता त्यावर “ॲक्शन” सुरू झाली आहे.

भाजपला जुन्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांना परत एकत्र करायचे आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण मधला प्रभावी तेलगू देशम पक्ष, पंजाब मधले शिरोमणी अकाली दल महाराष्ट्रातली शिवसेना ही 3 पक्ष मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या राजकीय कारणांसाठी भाजप पासून दूर गेले होते. ते “घरवापसी” करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणण्याची दोन्ही बाजूंची तयारी दिसते आहे. विशिष्ट मतभेद कायम ठेवूनही किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर हे पक्ष एकत्र आणण्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची तयारी आहे आणि समोरच्या पक्षांकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

पंजाब मध्ये अकाली – भाजप मैत्री

पंजाबमध्ये अकाली दलाची राजकीय मजबुरी वेगळी आहे. त्यांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर त्यांना भाजप सारख्या मित्र पक्षाची नव्याने गरज निर्माण झाली आहे. कारण आता पंजाब मध्ये फक्त काँग्रेसशी लढत उरलेली नाही, तर नव्या सत्ताधारी आम आदमी पार्टीशी देखील अकाली दलाला टक्कर द्यावी लागणार आहे आणि अकाली दलाची आता तेवढी ताकद उरलेली नाही. त्यामुळे भाजपची शक्ती अकाली दलाला पूरक ठरविण्याची देखील चर्चा आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात दोनच वर्षांपूर्वी 2020 मध्ये अकाली दल भाजपपासून दूर गेला होता. पण त्याचा निवडणुकीत फार मोठा फटका पक्षाला सहन करावा लागला होता. यातून धडा घेत भाजप आणि अकाली दल हे दोन्ही पक्ष आता राजकीय दृष्ट्या जवळ येत आहेत.

आंध्र, तेलंगणात चंद्राबाबू – भाजप

जे पंजाब मध्ये अकाली दलाचे तेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणात तेलगू देशांचे तेलगू देशम हा पक्ष देखील चंद्रावरून नायडूंच्या हट्टाग्रहासाठी भाजपपासून दूर गेला होता. तेलगू देशमला स्वबळाची स्वबळाचा आत्मविश्वास अहंकारापर्यंत पोहोचला होता. पण आंध्र आणि तेलंगण या दोन्ही राज्यांमध्ये पक्षाने सपाटून मार खाल्ला. राजकीय दृष्ट्या चंद्राबाबू नायडू यांना नगण्य होण्याची वेळ आली. यातून गेल्या चार वर्षात चंद्राबाबू पुरेसा धडा शिकले आहेत.

भाजपला देखील आंध्र आणि तेलंगण मध्ये राजकीय पायरोवा करण्यासाठी चंद्राबाबू यांचा प्लॅटफॉर्म उपयोगी ठरू शकतो, याची जाणीव झाली आहे. लोकसभेतली आपली टॅली वाढवायची असेल तर नवे मित्रपक्ष जोडलेच पाहिजेत, पण त्याचबरोबर जुन्यांनाही बरोबर घेतले पाहिजे हा मोदींचा आग्रह आता भाजपलाही नेमकेपणाने समजायला लागला आहे. त्यामुळे चंद्राबाबू आणि अमित शहा यांच्या बैठकीचे प्रत्यक्ष रूपांतर राजकीय व्यवहारात होताना दिसत आहे.

प्रादेशिक तारेवरची कसरत

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ममता बॅनर्जींची तृणामूळ काँग्रेस, नवीन पटनाईक यांचा यांचे बिजू जनता दल हे देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष होते. पण हे दोन्ही पक्षाचा पश्चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांमध्ये स्वबळावर सत्तेवर आहेत. यातल्या ममता बॅनर्जी यांचा तर भाजपची उभा दावा आहे. पण नवीन पटनायक मात्र भाजपशी केंद्रात मैत्री आणि राज्यात राजकीय मतभेद हे राजकीय संतुलन उत्तम राखून आहेत. त्यांच्या पक्षाने नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला नव्हता. तसेच आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने देखील हीच तारेवरची कसरत योग्य पद्धतीने सुरू ठेवली आहे. मोदी – शहा यांच्याशी केंद्रात पंगा घ्यायचा नाही आणि राज्यातील सत्ता सोडायची नाही हे जगन मोहन रेड्डींना चांगले जमले आहे. त्यामुळे आंध्रात जगमोहन रेड्डींची टक्कर घेण्यासाठी चंद्राबाबूंचा भाजपला उपयोग होऊ शकतो आणि चंद्राबाबूंची ही राजकीय गरज भागवू शकते.

राजकीय व्यावहारिक पातळीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे पुनरुज्जीवन हे भाजपची लोकसभेतील 303 ची टॅली वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. यात केवळ कर्नाटक मधला पराभव अथवा येत्या वर्षा अखेर 4 राज्यांमधल्या होणाऱ्या विधानसभा निवडणुका एवढा पुरता संदर्भ मर्यादित नाही, तर तो त्यापलीकडचा मोदींच्या नेतृत्वाखाली देखील भाजप मित्र पक्षांची सौहार्द राखू शकतो. तसेच स्वतःच्या बळावर बहुमत मिळवल्यानंतरही वाजपेयींसारखी एक सर्वसामावेशक भूमिका घेऊ यातून भाजपच्या विद्यमान नेतृत्वाला सिद्ध करायचे आहे. म्हणूनच वाजपेयी पुण्यतिथीच्या राजकीय मुहूर्तावर जुन्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या पुनरुज्जीवनाचा घाट भाजपने घातल्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.

BJP looks to bring old allies on board for 25 years of NDA

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात