विशेष प्रतिनिधी
भोपाल : Colonel Sophia Qureshi कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी झालेल्या वादग्रस्त विधानांनंतर मध्य प्रदेश भाजपने आपल्या नेत्यांसाठी सार्वजनिक भाषण कौशल्यावर आधारित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर जून महिन्यात भोपाल येथे होणार असून, नेत्यांनी बोलताना होणाऱ्या चुकांपासून बचाव करावा आणि प्रभावी संवाद साधावा यावर भर दिला जाणार आहे.Colonel Sophia Qureshi
मात्र, पक्षाने हे स्पष्ट केले आहे की, हे शिबिर केवळ नियोजित कार्यक्रमाचा एक भाग असून, याचा सध्याच्या वादांशी काही संबंध नाही. राज्य भाजप प्रवक्त्याने सांगितले, “हे प्रशिक्षण सत्र पूर्वीपासून ठरलेले होते. असे शिबिरे आम्ही नियमितपणे घेत असतो. सध्याच्या घडामोडींचा याच्याशी काही संबंध नाही.”
भाजपचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान माध्यमांसमोर आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी अत्यंत वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्य करत त्यांना “दहशतवाद्यांची बहीण” असे संबोधले होते. यावरून प्रचंड टीका झाली असून, उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
त्याच वेळी उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी देखील वाद ओढावणारे विधान करत, “भारतीय लष्कर आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरणी नतमस्तक आहेत,” असे म्हटले होते. नंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला.
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “याआधीही 2023 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी सेहोर येथे अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्षांनी भाग घेतला होता. अशा शिबिरांमागे उद्दिष्ट असते पक्षाच्या विचारसरणीची माहिती देणे आणि जनतेशी सुस्पष्ट, प्रभावी संवाद साधण्यासाठी नेतृत्व कौशल्य विकसित करणे.”
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारताने ७ मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर जोरदार लक्ष्यभेदी हल्ले केले होते. याआधी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने ८, ९ व १० मे रोजी भारतीय लष्करी ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता, ज्यावर भारताने कठोर प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लष्करी तळांवर, नियंत्रण केंद्रांवर आणि रडार यंत्रणांवर लक्ष्य करून हल्ले चढवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App