2015 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये केला होता प्रवेश
विशेष प्रतिनिधी
इटानगर : अरुणाचल प्रदेशच्या खोंसा (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यमसेन माटे यांची उग्रवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना भारत-म्यानमार सीमेजवळ तिरप जिल्ह्यात घडली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. माजी आमदार काही वैयक्तिक कामासाठी गेले असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.BJP leader Yamsen Mate killed in Arunachal Pradesh Shots fired in the forest on the India Myanmar border
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना म्यानमार सीमेजवळ असलेल्या राहो गावाजवळ दुपारी ३ वाजता घडली. तिरपचे पोलिस अधीक्षक (एसपी) राहुल गुप्ता यांनी सांगितले की, काँग्रेसचे माजी आमदार यमसेन माटे हे त्यांच्या तीन समर्थकांसह काही वैयक्तिक कामानिमित्त गावात गेले होते, तेव्हा कोणीतरी त्यांना कोणत्या तरी बहाण्याने जंगलात नेले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षकांनी हल्लेखोरांची ओळख उघड करण्यास तूर्तास जरी टाळले असले, तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येमध्ये NSCN-KYAचा समावेश असण्याची शक्यता आहे.
माटे हे 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर खोंसा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या वर्षाच्या सुरुवातीला 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी चांगलांग जिल्ह्यात जिल्हा प्रौढ शिक्षण अधिकारी म्हणून काम केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App