विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष विजयी होणार आहे. पंजाबमध्ये मात्र अंतर्गत कलहामुळे अगोदरच जर्जर झालेल्या कॉँग्रेसला आम आदमी पक्ष धोबीपछाड देणार असल्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सी व्होटरने केलेल्या सर्व्हेत व्यक्त केली आहे.BJP in Uttar Pradesh, Aap in Punjab, BJP will keep Uttarakhand, Goa , ABB-C Voter News Survey
या सवेर्नुसार उत्तर प्रदेशात भाजपला 259 ते 267 जागा मिळतील. समाजवादी पक्षाला 109 ते 117, बसपाला 12 ते 16, तर काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजप सत्ता राखेल परंतु त्यांच्या जागा कमी होतील. मात्र, समाजवादी पक्षाच्या जागा वाढणार आहेत.
सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशातील 45 टक्के लोक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कामाकाजावर समाधानी आहेत. 34 टक्के लोक असमाधानी आहेत. विरोधी पक्षांनी आपली भूमिका योग्यरित्या निभावली का? असा सवालही मतदारांना विचारण्यात आला होता. त्यावेळी 40 टक्के लोकांनी विरोधी पक्षाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. 34 टक्के लोक विरोधकांवर नाराज आहेत.
उत्तर प्रदेशला लागून असलेल्या उत्तराखंडमध्येही पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. उत्तराखंडमध्ये भाजपला 44 ते 48 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 19 ते 23 जागा, आम आदमी पक्षाला 0 ते 4 जागा, तर अन्य पक्षांना 0 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर 36 टक्के लोक समाधानी आहेत.
पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता या सर्वेक्षणातून व्यक्त केली गेलीय. पंजाबमध्ये काँग्रेसला 38 ते 46 जागा मिळू शकतात. आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मोठी ताकद बनत 51 ते 57 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनेल. पंजाबमधील लोक 18 टक्के लोक कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छितात. तर 22 टक्के लोक अरविंद केजरीवाल यांना पसंती देत आहेत.
19 टक्के लोक सुखबीर बादल यांना, 16 टक्के लोक भगवंत मान यांना, 15 टक्के लोक नवज्योत सिंह सिद्धू यांना तर 10 टक्के लोक अन्य चेहºयांनामुख्यमंत्रीपदाचा उमेदवार पसंती देतो.
गोव्यात भाजपला 39 टक्के, काँग्रेसला 15 टक्के, आम आदमी पक्षाला 22 टक्के तर अन्य पक्षाला 24 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला 22 ते 26 जागा, काँग्रेसच्या खात्यात 3 ते 7 जागा, आम आदमी पक्षाला 4 ते 8 जागा आणि अन्य पक्षाला 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
मणिपूरमध्ये भाजपला 40 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 35 टक्क, एनपीएफला 6 टक्के आणि 17 टक्के मते इतरांना मिळू शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App