विशेष प्रतिनिधी
कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजप समर्थकांना ममता प्रचारसभेत धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.BJP complaints against Mamta Banerjee over revenge speech
भाजप नेते शिशीर बजोरिया, अर्जुन सिंह आणि प्रताप बॅनर्जी यांनी आयोगाने पत्र पाठविले आहे. त्यात एका व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करण्यात आला आहे. केंद्राची निमलष्करी दले एके दिवसी परत जातील, पण मी बंगालमध्येच राहीन.
मग माझ्या विरोधकांना कोण वाचवणार?, असे नंदीग्राम येथे २९ मार्च रोजी झालेल्या सभेत ममता यांनी म्हटल्याचा दावा भाजपने केला आहे.तृणमूलच्या राजकारण करण्याच्या पद्धतीमुळे गैरप्रकार अटळ असल्याचा दावा करून भाजपने म्हटले आहे की, हिंसाचार रोखला जात नाही.
मतदारांवर हल्ले होतात. तृणमूलच्या हस्तकांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखणे अशक्य ठरते. मतदानाच्या आधी आणि मतदानाच्या दिवशी भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App