BJP : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी केली 9 उमेदवारांची घोषणा!

हरियाणातून किरण चौधरी, राजस्थानमधून रवनीत सिंह बिट्टू; जाणून घ्या, महाराष्ट्रातून कोण? BJP announced 9 candidates for Rajya Sabha elections

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नऊ राज्यांमधील राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 12 पैकी 11 जागांवर निवडणूक लढवत आहे.


Badlapur Case : संतप्त पालकांनी शाळा फोडली; पोलिसांवर दगडफेक; बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT गठीत!!


भाजपने मंगळवारी 9 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. बिहारमधील एक जागा उपेंद्र कुशवाह आणि महाराष्ट्राची जागा अजित पवार यांच्या पक्षाला देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू राजस्थानमधून निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना खासदारकीचे उमेदवार केले आहे. याशिवाय किरण चौधरी हरियाणामधून, ममता मोहंता ओडिशातून निवडणूक लढवणार आहेत. त्रिपुरातून राजीव भट्टाचार्य, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, बिहारमधून मनन कुमार मिश्रा राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. आसाममधून रंजन दास यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

BJP announced 9 candidates for Rajya Sabha elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात