Amit Shah : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजप + अण्णा द्रमुक युती जाहीर; ईडापड्डी पलानीस्वामींकडे नेतृत्व!!

Amit Shah

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : तामिळनाडू विधानसभेच्या 2026 एप्रिल मे मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांनी युती जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या युतीचे नेतृत्व अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते ईडापड्डी पलानीस्वामी यांच्याकडे सोपविले. त्यावेळी अण्णामलाई अमित शहा यांच्या डाव्या बाजूला बसले होते. अमित शाह यांनी चेन्नईमध्ये जाऊन भाजप आणि अण्णा द्रमुक यांची युती जाहीर केली. तामिळनाडू विधानसभेची निवडणूक दोन्ही पक्ष NDA चे घटक दल म्हणून लढवतील असे त्यांनी जाहीर केले. Tamil Nadu assembly elections

मात्र ही युती होण्यापूर्वी तामिळनाडूच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या. अण्णा द्रविड म्हणून मित्र कळधम चे नेते ईडापड्डी पलानीस्वामी आणि भाजपचे आधीचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई हे दोन्ही नेते तामिळनाडूतल्या गौंडर या ओबीसी समाजातले असल्याने दोन पक्षांमध्ये राजकीय आणि सामाजिक समस्या निर्माण झाली होती. भाजपने अण्णामलाई यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करून त्या जागेवर नयनार नागेंद्र यांची नियुक्ती केली. याच दरम्यान ईडापड्डी पलानीस्वामी राजधानी नवी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. या दोन्ही नेत्यांच्या चर्चेमध्ये भाजप आणि अण्णा द्रमुक यांच्या युतीचा पाया रचला गेला. त्यानंतर आज अमित शाह यांनी चेन्नईमध्ये येऊन पत्रकार परिषदेत दोन पक्षांच्या युतीची घोषणा केली.

यावेळी अमित शहा यांनी द्रविड मुन्नेत्र कळघमच्या एम. के. स्टालिन सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. सनातन धर्माचा अपमान, डी लिमिटेशन बाबत खोटे बोलणे हे सगळे स्टालिन सरकार आणि उदयनिधी करत आहेत. ते केवळ स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी असले उद्योग करतात, असा आरोप अमित शाह यांनी केला. स्टालिन सरकारने 4000 कोटी रुपयांचा दारू घोटाळा केला. त्याचबरोबर वाळू खनन घोटाळा, फ्री धोतर वाटप घोटाळा, मनरेगा घोटाळा यांसारखे अनेक घोटाळे त्यांच्या नावावर आहेत. या घोटाळ्यांची उत्तरे तामिळ जनता त्यांच्याकडे मागितल्याशिवाय राहणार नाही, असेही अमित शाह म्हणाले.

भाजप आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही पक्षांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी हे दोन्ही पक्ष किमान समान कार्यक्रमाच्या आधारे तामिळनाडूमध्ये प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करतील, असा दावाही त्यांनी केला.

 

BJP + AIADMK alliance announced for Tamil Nadu assembly elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात