भाजपाने केली जय्यत तयारी; देशभरात सुमारे चार लाख ठिकाणी केली कार्यक्रम ऐकण्याची व्यवस्था
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण होत आहेत. यानिमित्त भाजपाने देशभरात जय्यत तयारी केली आहे. इथे महाराष्ट्रातही मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभेतील तब्बल पाच हजारांहून अधिक ठिकाणी “मन की बात” कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. एवढच नाही तर या मन की बात कार्यक्रमाच्या शतकाबद्दल थेट बिल गेट्स यांनीही पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. Bill Gates congratulates PM Modi on completion of 100 episodes of Mann Ki Baat
बिल गेट्स यांनी ट्विट करून म्हटले की, ‘मन की बात’ने स्वच्छता, आरोग्य, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्टांशी संबंधित इतर मुद्द्यांवर समुदायाच्या नेतृत्वाखालील कृती उत्प्रेरित केली आहे.
३ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा प्रसारित झालेल्या पंतप्रधान मोदींच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचे आज(३० एप्रिल २०२३) रोजी १०० भाग पूर्ण होत आहेत. या प्रतिष्ठित कार्यक्रमाचा १०० वा भाग खाजगी FM स्टेशन, कम्युनिटी रेडिओ आणि विविध टीव्ही चॅनेलसह १००० रेडिओ स्टेशनवर प्रसारित केला जाईल.
Mann ki Baat has catalyzed community led action on sanitation, health, women’s economic empowerment and other issues linked to the Sustainable Development Goals. Congratulations @narendramodi on the 100th episode. https://t.co/yg1Di2srjE — Bill Gates (@BillGates) April 29, 2023
Mann ki Baat has catalyzed community led action on sanitation, health, women’s economic empowerment and other issues linked to the Sustainable Development Goals. Congratulations @narendramodi on the 100th episode. https://t.co/yg1Di2srjE
— Bill Gates (@BillGates) April 29, 2023
भाजपाने सांगितले की देशभरात सुमारे चार लाख ठिकाणी व्यवस्था केली गेली आहे. जेणेकरून लोक पंतप्रधानांचे भाषण ऐकू शकतील, पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा याला ऐतिहासिक आणि यशस्वी करण्यासाठी संपूर्ण तयारीचे निरीक्षण करतील.
‘मन की बात @ 100’ कार्यक्रमादरम्यान एक स्मरणार्थ टपाल तिकीट आणि एक नाणेही प्रसिद्ध करण्यात आले. आगामी कार्यक्रमाबद्दलचा उत्साह शेअर करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते त्यांच्या रेडिओ कार्यक्रमाच्या १००व्या भागाची “आतुरतेने वाट पाहत आहेत”.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App