बिहारमध्ये Gen Z आणि महिलांचा ज्येष्ठ नेत्यांवर विश्वास; बाता मारणाऱ्या चिरतरुण नेत्यांना चपराक!!

Gen Z आणि महिलांचा ज्येष्ठ नेत्यांवर विश्वास; बाता मारणाऱ्या चिरतरुण नेत्यांना चपराक!!, हे खरं म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे खरे फलित आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रत्यक्ष निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीच्या नंतर राहुल गांधी, तेजस्वी यादव, कन्हैया कुमार या तरुण नेत्यांनी Gen Z क्रांतीच्या मोठमोठ्या बाता मारल्या. त्यासाठी त्यांनी नेपाळ आणि बांगलादेशातली उदाहरणे दिली. बिहार मधली तरुणाई आणि महिला यांना बदल हवा आहे. त्यांना नीतीश कुमार यांच्यासारखे वयोवृद्ध आणि आजारी नेते मुख्यमंत्रीपदावर नको आहेत, असा प्रचार केला. नितीश कुमार यांनी महिलांच्या खात्यात 10000 रुपये भरून केलेल्या राजकीय बेगमीला तोड म्हणून तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये प्रत्येक घरात सरकारी नोकरीचे आमिष दाखविले. त्यांनी तरुणाईला जवळ केले. महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले.

याच दरम्यानच्या काळात राहुल गांधींनी कन्हैया कुमारची प्रतिमा निर्मिती करायचा मोठा प्रयत्न केला. त्याला कायम आपल्याबरोबर ठेवले त्याला बरोबर घेऊनच मतदार अधिकार यात्रा काढली. केंद्रात राहुल गांधी आणि बिहारमध्ये कन्हैया कुमार असा प्रचार करायचा प्रयत्न केला. आपण सगळे तरुण नेते आहोत तरुणांचे मसीहा आहोत हे भासविण्याचा डाव खेळला.

– विश्वास निर्माण करायचा अभाव

पण प्रत्यक्षात बिहार मधल्या Gen Z ने वयोवृद्ध नेते नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या जोडगळीवरच विश्वास ठेवला. राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि कन्हैया कुमार या चिरतरुण नेत्यांची जादू बिहार मधल्या Gen Z वर चालली नाही. हे चिरतरुण नेते बिहारच्या जनतेमध्ये विश्वास निर्माण करू शकले नाहीत. बिहारचे निकाल जर विरोधात गेले, तर राज्यातली जनता आणि Gen Z रस्त्यावर उतरेल, अशी दमबाजी तेजस्वी यादव यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केली, पण आज निकाल लागल्याच्या सायंकाळपर्यंत दमबाजी करणारे नेते गायब झाले.

बिहारच्या निवडणुकीचे आणि त्याआधीच्या निवडणुकांचे सगळे खापर राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फोडले. राहुल गांधींच्याच आरोपांचे रिपीटेशन बाकीच्या काँग्रेस नेत्यांनी केले. पण त्यांच्यावर बिहार मधल्या जनतेने विश्वास ठेवला नसल्याचेच आकड्यांमधून समोर आले. बिहारमध्ये काँग्रेसच्या आमदार संख्येने ऐतिहासिक तळ गाठला. बिहार मधून लोकसभेत काँग्रेसचे 10 खासदार पोहोचले, तरी बिहार विधानसभेत मात्र 4 आमदार पोहोचताना काँग्रेसची दमछाक झाली.

– राजदचे टक्क्यांमध्ये यश, जागांमध्ये अपयश

लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाना भाजप पेक्षा जास्त टक्के मते मिळवण्यात यश मिळाले. राजदला 22.76 % मते मिळाली. भाजपला 20.21 % मते मिळाली. जदयूला 19.19 % मते मिळाली, तर काँग्रेसला 8.77 % मते मिळाली. पण राजद आणि काँग्रेसला जिथे विजय मिळाला तिथेच मोठ्या प्रमाणावर मते पडली आणि इतर ठिकाणी त्यांचा मत विभागणी आणि थोडक्या मतांनी पराभव झाला त्यांना निवडणुकीच्या मतांचे व्यवस्थापन व्यवस्थित करता आले नाही.

– काँग्रेसची फरफट

एकेकाळी काँग्रेस सर्वसमावेशक पक्ष होता. त्या पक्षाची प्रादेशिक पक्षांच्या मागे आणि प्रादेशिक पक्षांच्या अजेंड्यावर फरफट होत नव्हती उलट काँग्रेसच्या मागे प्रादेशिक नेत्यांची फरपट व्हायची. बिहारमध्ये याच्या नेमके उलट घडले. राष्ट्रीय जनता दलाच्या मुस्लिम + यादव समीकरणाच्या पाठीमागे काँग्रेसची फरपट झाली. राहुल गांधींच्या इच्छेच्या विरोधात जाऊन काँग्रेसला राष्ट्रीय जनता दलाची तडजोड करावी लागली. तेजस्वी यादव आणि मुकेश सहानी हे चेहरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पुढे आणावे लागले. पण या चेहऱ्यांना काँग्रेस आणि त्यांचे सगळे बौद्धिक + सामाजिक आणि राजकीय मित्र कुठलीही राजकीय विश्वासार्हता चिकटवू शकले नाहीत. किंबहुना राजकीय विश्वासार्हतेचा अभाव हेच काँग्रेसच्या आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महागठबंधनच्या पराभवाचे कारण ठरले सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन सुद्धा तरुणांना त्या पक्षांकडे आणि त्यांच्या चिरतरुण नेत्यांकडे आकर्षित करू शकले नाही.

– वयोवृद्धत्वाचा अनुभव मोलाचा

त्याउलट मोदींचा आश्वासक चेहरा आणि नितीश कुमार पलटी मारणार नाहीत याची खात्री पटल्यानंतर बिहारच्या जनतेने जातीच्या पलीकडे जाऊन त्यांच्या पारड्यात मते टाकली. मोदी आणि नितीश कुमार यांचे वयोवृद्धत्व त्यांच्या यशाच्या आड आले नाही. उलट त्यांची ज्येष्ठता आणि अनुभव म्हणून त्यांच्या यशात भरच पडली. नुसते वयाने तरुण असणे आणि तरुण असल्याचे भासविणे या गोष्टीला बिहारची जनता, तिथली Gen Z आणि महिला भुलल्या नाहीत. त्यांनी वयोवृद्ध नेते अनुभव आणि कर्तृत्व यांनी कशावर उचलून धरले.

दृष्टिक्षेपात बिहार निकाल

भाजप : 90

जदयू : 84

राजद : 25

लोक जनशक्ती ग्राम विलास पासवान : 19

काँग्रेस : 6

ए आय एम आय एम : 5

हिंदुस्थान अबाम मोर्चा : 5

अन्य : 9

Bihari people trusted senior leaders than so called young leaders

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात