Bihar motihari accident : बिहारच्या मोतिहारीमध्ये रविवारी मोठी दुर्घटना झाली. सीकरहाना नदीत बोट उलटल्याने 22 जण बुडाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी माहितीनुसार, आतापर्यंत एका मुलीचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. चांदनी कुमारी असे तिचे नाव आहे. बोट उलटल्याची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे. Bihar motihari accident 22 people drowned in the river due to boat capsizing
वृत्तसंस्था
पाटणा : बिहारच्या मोतिहारीमध्ये रविवारी मोठी दुर्घटना झाली. सीकरहाना नदीत बोट उलटल्याने 22 जण बुडाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी माहितीनुसार, आतापर्यंत एका मुलीचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. चांदनी कुमारी असे तिचे नाव आहे. बोट उलटल्याची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. बचाव दल लोकांना बाहेर काढण्यात गुंतले आहे. त्याचबरोबर स्थानिक पाणबुडेही बचाव कार्यात मदत करत आहेत. बोट चालविणारी व्यक्ती पोहून बाहेर निघण्यात यशस्वी झाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे. पोलीस दलही घटनास्थळी उपस्थित आहे. स्थानिक लोकही मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
यापूर्वी पर्वलपूरच्या लक्ष्मी बिघा गावात मूर्ती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना झाली होती. येथे 7 मुली पाण्यात बुडाल्या. यापैकी दोन जणांना गावकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले होते. आता 22 जणांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Bihar motihari accident 22 people drowned in the river due to boat capsizing
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App