वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज राजधानी दिल्लीत येऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी विरोधी पक्षांच्या ऐक्या बाबत चर्चा केली. केंद्र सरकारने दिल्ली दिल्ली सरकारचे कथित अधिकार कमी करण्यासंदर्भात आणलेल्या एका अध्यादेशाविरुद्ध या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी केजरीवाल हे सत्तेचे हपापलेले आहेत, अशा शब्दात त्यांचे वाभाडे काढले आहेत. bihar cm nitish kumar meets to delhi cm arvind kejariwal
नितीश कुमार सध्या स्वतःचे राज्य सोडून देशभरातल्या विविध राज्यांमध्ये विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी फिरत आहेत. त्यांनी मध्यंतरी मुंबईतून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते आज दिल्लीत आले आणि त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याशी त्याच विषयावर चर्चा केली.
केजरीवाल सरकार विरुद्ध दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. तो थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यासंदर्भात काही मत व्यक्त केल्यानंतर केजरीवाल यांनी स्वतःच्या सरकारच्या अधिकारांचे हनन सहन करणार नाही, असे म्हटले आहे. मात्र त्यावर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या पार्श्वभूमीवर नितीश कुमार आणि केजरीवाल यांच्यात राज्य सरकारच्या अधिकारांविषयी विशिष्ट चर्चा झाली. येत्या तीन दिवसांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी आपली चर्चा होणार असून त्यानंतर आपण देशभरातल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटून केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार आहोत, असे केजरीवाल यांनी जाहीर केले.
मात्र दरम्यानच्या काळात दिल्लीचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र माजी खासदार संदीप दीक्षित यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. केजरीवाल हे सत्तेचे हपापले नेते आहेत. त्यांचे सरकार भ्रष्टाचारात अखंड बुडाले आहे. त्यांचे मंत्री तुरुंगात आहेत. त्यांचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर आले आहेत. त्यामुळे त्यांनी कितीही विरोधी ऐक्याचा आणि भ्रष्टाचारा विरोधात लढण्याचा आव आणला तरी प्रत्यक्षात त्यांचेच सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे, अशा शब्दांत संदीप दीक्षित यांनी केजरीवालांचे वाभाडे काढले आणि नितीश कुमार – केजरीवाल चर्चेवर बोळा फिरवून टाकला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App