वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Naxals गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंद देश नक्षलमुक्त होईल, असे जाहीर केले होते. या मोहिमेअंतर्गत यंदा आतापर्यंत ११४ दिवसांत १६१ नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. सुमारे ६०० जणांनी शरणागती पत्करली आहे. २०२४ मध्ये संपूर्ण वर्षात २९६ व २०२३ मध्ये ५६ जण मारले गेले होते. म्हणजे दोन वर्षांतच नक्षलीविरुद्ध घातक कारवाईत ५२८ टक्क्यांची वाढ झाली आहे.Naxals
परिणामी बस्तर, बिजापूर आणि आता मंडला म्हणजे नक्षलवाद्यांचा भूगोल संकोचला जात आहे. गृहमंत्रालयाशी संबंधित सूत्रानुसार २०१८ मध्ये ११ राज्यांतील १२६ जिल्हे नक्षलग्रस्त होते. २०२४ पर्यंत त्यात घट होऊन ते ३८ झाले. सर्वाधिक प्रभावित ६ जिल्ह्यांपैकी ४ छत्तीसगड, १ महाराष्ट्र, १ झारखंडमध्ये आहेत. बाकी ३२ जिल्हे या दृष्टीने ‘मध्यम’ किंवा मर्यादित श्रेणीत मोडतात. आता हे नक्षली आंदोलन मोजक्या भागापुरते राहिले आहे. अशा भागातदेखील सुरक्षा दलाची पकड आणखी मजबूत होत आहे.
तज्ज्ञ म्हणाले- डिजिटल आघाडीसाठी शहरी भागात भरती सुरू
अशा प्रकरणांशी संबंधित सुरक्षा विश्लेषकांच्या दृष्टीने डिजिटल आघाडी ही नक्षली नवे आव्हान असल्याचे मानतात. आता लढाई केवळ जंगलातच नव्हे तर मोबाइल, लॅपटॉपच्या स्क्रीनवरही ती लढली जात आहे. नक्षली संघटना वेगाने डिजिटल प्रचार व ऑनलाइन भरतीद्वारे शहरी तरुणांना जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांना लक्ष्य केले जात आहे.
माओवादाच्या विरोधात सुरक्षा दलाचे अभियान जोरात सुरू असले तरीही सरकारने चर्चेचे मार्ग पूर्णपणे बंद केलेले नाहीत. गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, नक्षलींनी हिंसा सोडल्यास सरकार चर्चेस तयार आहे.
नक्षलींच्या विरोधातील मोहिमेत सुरक्षा दलांची परिपक्व अशी रणनीती समोर आली आहे. यंदा आतापर्यंत एक जवान शहीद झाल्याच्या घटनेत प्रत्युत्तरात ११ नक्षलींचा खात्मा करण्यात आला. २०२५ मध्ये आतापर्यंत ६०० नक्षलींनी आत्मसमर्पण केले आहे. हा आकडा २०२४ च्या संपूर्ण वर्षातील ४७५ पेक्षा जास्त आहे. २०२३ मध्ये ही संख्या २६८ होती. म्हणजे दोन वर्षांत १३०० माओवादी मुख्य प्रवाहात परतले. दुसरा अर्थ असा की आता प्रत्यक्षात हिंसाचार नाही. त्यांच्यावर मानसिक दबाव आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App