पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीचे मोठे अपडेट! राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा मतदान होणार

Voting result

६०४ बूथचा समावेश आहे जिथे फेरमतदान होणार आहे.

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये पंचायत निवडणुकीसाठी पुन्हा मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने रविवारी (९ जुलै) सांगितले की, पंचायत निवडणुकीसाठी पुरुलिया, बीरभूम, जलपाईगुडी आणि दक्षिण २४ परगणा येथे पुन्हा मतदान होणार आहे. Big Update on West Bengal Panchayat Election As per the order of the State Election Commission  re polling will be held in some districts

बंगाल राज्य निवडणूक आयोगाने मतदान अवैध घोषित केलेल्या बूथवर सोमवारी (१० जुलै) पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ६०४ बूथचा समावेश आहे जिथे फेरमतदान होणार आहे.

पश्चिम बंगालमधील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. या दरम्यान झालेल्या हिंसाचारात १५ जणांचा मृत्यू झाला आहे.  अधिका-यांनी सांगितले की, ज्या जिल्ह्यांमध्ये पुनर्मतदान जाहीर झाले, त्यापैकी मुर्शिदाबादमध्ये सर्वाधिक १७५ बूथ आहेत, त्यानंतर मालदामध्ये ११२ बूथ आहेत. हिंसाचारग्रस्त नादियातील ८९ बूथवर फेरमतदान होणार आहे, तर उत्तर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील ४६ आणि ३६ बूथवर फेरमतदान होणार आहे. एकूण ६०४ बूथवर मतदान होणार आहे.

Big Update on West Bengal Panchayat Election As per the order of the State Election Commission  re polling will be held in some districts

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात