मुंबईत ठाकरे गटाला उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीला भाजपची खणती; बड्या चेहऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते रोज भाजपवर तोंडी हल्लाबोल करत आहेत. विधिमंडळ अधिवेशनात शिंदे – फडणवीस सरकारचे वाभाडे काढत आहेत. पण प्रत्यक्ष “राजकीय कृती” मात्र भाजप आणि शिंदे गटच करत आहेत. कारण शिंदे गट आणि भाजपने मुंबईत ठाकरे गटाला, तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काँग्रेस – राष्ट्रवादीला खणती लावली आहे. Big surgical Strike on Congress and NCP by BJP in maharashtra

वास्तविक भाजप नेत्यांनी ही सुरुंग पेरणी आधीच केली आहे. तेच सुरूंग आता मुंबई उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात फुटत आहेत. अनेक बडे नेते आणि नेत्यांची मुले यांनी शिंदे गट अथवा भाजपची वाट धरली आहे. विदर्भात माजी खासदार आणि माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे कमळ हातात धरले आहे, तर नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सभेचे अध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे पाटील यांनी किसान सभेचे अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपच्या दिशेने आपला मोहरा वळवला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या आर्किटेक अमृता पवार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आल्या आहेत. या प्रत्येक नेत्याची पाळेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये घट्ट होती. पण या नेत्यांना राजकीय दृष्ट्या काही देण्यासारखे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही शिल्लक राहिले नाही म्हणून या नेत्यांनी ते पक्ष सोडून भाजपची वाट धरली आहे.



यापैकी प्रत्येक नेत्याचा त्यांच्या मतदारसंघांमध्ये विशिष्ट प्रभाव आहे आणि भाजपसाठी ते बेरजेचे राजकारण ठरू शकते. भाजपला तसेही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने 200 जागी उमेदवार उभे करण्याचे मोठे आव्हान आहेच. हे उमेदवार जसे भाजपचे निष्ठावंत असू शकतात, तसेच ते तसेच भरपूर उमेदवार बाहेरच्या पक्षातून सुद्धा घ्यावे लागणार आहेत. कारण भाजपने आत्तापर्यंत विधानसभेच्या 200 जागा कधीच लढवलेल्या नाहीत. भाजप 200 जागा आणि शिंदे गड ८८ जागा असे जर जागावाटप झाले, तर भाजपचे सव्वाशे उमेदवार तयार असू शकतात पण 75 उमेदवार त्यांना इलेक्टिव्ह मेरिटच्या निकषानुसार बाहेरून घ्यावे लागणार आहेत, तर शिंदे गटाकडे आधीच 40 आमदार आहेत. 10 पक्ष आमदार आहेत. याचा अर्थ किमान 38 ते 40 उमेदवार त्यांना बाहेरच्या पक्षातून घ्यावे लागणार आहेत.

त्यामुळे बाहेरच्या पक्षातून भाजप किंवा शिंदे गटांमध्ये आलेल्या राजकीय सोय म्हणून भरपूर संधी उपलब्ध होणार आहे. अर्थात ती संधी त्यांच्या व्यक्तिगत राजकीय चॉईस पेक्षा पक्षाच्या चॉईसची अधिक असेल. हे भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांना गृहीत धरावे लागेलते त्यांना मान्य असेल तर राजकीय भवितव्याच्या दृष्टीने भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांसाठी ते अनुकूल ठरू शकेल.

Big surgical Strike on Congress and NCP by BJP in maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात