वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम कोचना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. निसर्ग दर्शनाने प्रवासी सुखावले असून रेल्वेला २.३८ कोटी रुपयांचे उत्पन्न आजअखेर मिळाले आहे. Big response to Vistadom Koch ; The sight of nature comforted the traveler; Central Railway earns Rs 2.38 crore
प्रवाशांना प्रवासादरम्यान निसर्गरम्य स्थळांचा आनंद घेता यावा. दृश्य टिपता यावीत, यासाठी रेल्वेने खास पारदर्शक असे व्हिस्टाडोम डबे तयार करून ते रेल्वेला जोडले आहेत. त्या माध्यमातून नद्या, धबधबे, पश्चिम घाटाचे पारदर्शी दर्शन प्रवाशांना घेता आले. मुंबई ते गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या, धबधबे, पश्चिम घाट अशी दृश्ये प्रवासी आपल्या डोळ्यांत कैद करीत आहेत. याद्वारे मध्य रेल्वेने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या काळात २०,४०७ प्रवाशांची नोंद केली. त्या माध्यमातून २.३८ कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेने प्राप्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App