I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत 10 पक्ष सहभागी झाले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बैठकीत नितीश कुमार यांना संयोजक बनवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र नितीशकुमार यांनी संयोजक होण्यास नकार दिला. नितीश कुमार म्हणाले की, संयोजक काँग्रेसचाच असावा. I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत 10 पक्ष सहभागी झाले होते.Big news regarding I.N.D.I.A front meeting Nitish Kumar rejects offer to be convener
मला कोणत्याही पदामध्ये स्वारस्य नाही. संयोजक हा काँग्रेसचाच असावा. असं नितीश कुमार म्हणाले आहेत. नितीश यांच्या नकारानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची संयोजकपदासाठी चर्चा आहे.
उल्लेखनीय आहे की आज I.N.D.I.A आघाडीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. या बैठकीची छायाचित्रेही समोर आली असून, त्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेते दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App