वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जगाच्या पाठीवर सध्या अनेक राष्ट्रांमध्ये वाद, मतभेद आणि युद्धाची ठिणगी पडलेली असतानाच त्यात आणखी एका राष्ट्राचाही समावेश झाला आहे. शिया मुस्लिमबहुल राष्ट्र इराणने दहशतवादी कारवायांमुळे कुप्रसिद्ध असणाऱ्या पाकिस्तानवर हवाई हल्ला चढवला आहे.Big News: Iran’s Surgical Strike on Pakistan; The biggest hideout of terrorists was blown up
इराणच्या लष्करातील वायुदलाने पाकिस्तानात असणाऱ्या जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर मंगळवारी एअर स्ट्राईक करत हे तळ उध्वस्त केले आहेत.
इराणने मंगळवारी पाकिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इराक आणि सीरियावर हवाई हल्ल्याच्या एक दिवसानंतर इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये ही कारवाई केली आहे. या हल्ल्यानंतर इराणने त्यात अनेक दहशतवादी मारल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे वृत्त इराणच्या राज्य माध्यमांनी दिले आहे.
इराणने दावा केलाय की, हा हल्ला त्यांच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) ने पाकिस्तानात सुन्नी बलूच दहशतवादी समूह जैश अल-अदलवर मिसाइल आणि ड्रोनने केला आहे. समाचार एजेंसी रायटर्सकडून सांगण्यात आले की, इराणने पाकिस्तानात जैश अल अदलच्या दोन ठिकाणांवर हल्ले केले आहेत. अशी माहिती मिळाली आहे की, या दहशतवादी समूहाने पाकिस्तानातील सीमावर्ती भागांमध्ये असलेल्या इराणच्या सुरक्षादलांवर हल्ला केला होता.
इराणच्या सीमाभागात दहशतवादी हल्ले
मागील काही महिन्यांपासून इराणी सैन्य आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-अल-अदल यांच्यात चांगलीच चकमक सुरू आहे. सुरुवातीला जैश अल-अलदने इराणच्या सीमाभागात दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांनंतर इराणने पाकिस्तानला बजावले देखील होते. मात्र, तरी देखील जैश अल-अलदकडून इराणवर दहशतवादी कारवाया सुरूच होत्या. गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी इराणच्या सिस्तान-बलूचिस्तानमधील एका पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. ज्यात 14 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
2 निष्पाप मुलांचा मृत्यू – पाकिस्तान
याचाच बदला म्हणून इराणने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर मंगळवारी रात्री क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे. दुसरीकडे इराणने केलेल्या बेछूट हल्ल्यात 2 निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर 3 मुली जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App