विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी रविवारी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीतील वायू प्रदूषणाची धोकादायक पातळी पाहता सरकारने प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत, शाळांना इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या ऑनलाइन वर्गांमध्ये शिफ्ट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
शिक्षण मंत्री आतिशी म्हणाल्या की, दिल्लीतील वायू प्रदूषणाची उच्च पातळी आरोग्याच्या बाबतीत सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. विशेषत: लहान मुलांसाठी ते खूप हानिकारक ठरू शकते. त्यामुळेच वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारीही दिल्लीतील प्रदूषणापासून लोकांना दिलासा मिळण्याची फारशी शक्यता नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील शादीपूर भागातील लोकांना सर्वाधिक प्रदूषणाचा सामना करावा लागला. दिल्लीतील हवेची गुणवत्ता गेल्या तीन दिवसांपासून गंभीर श्रेणीत आहे.
प्रदूषणाच्या बाबतीत भारताचा जगात 8वा नंबर, टॉप 20 प्रदूषित शहरांपैकी 19 आशियातील, त्यातील 14 भारताची
दिल्लीच्या आरके पुरममध्ये AQI 489, द्वारका सेक्टर 8 मध्ये 486, ओखला फेज 2 मध्ये 484, पटपरगंजमध्ये 464, IGI विमानतळ (T3) च्या आसपास 480, बवानामध्ये 479, मुंडकामध्ये 474, नजफगढमध्ये 472 होते. दिल्लीतील इतर भागात AQI पातळी कमी-अधिक प्रमाणात समान आहे.
दिल्लीतील इंडिया गेट परिसरातील प्रदूषणाची स्थितीही गंभीर आहे. दिल्लीच्या कुतुबमिनार परिसरात ड्रोनच्या मदतीने काढलेल्या छायाचित्रात दक्षिण दिल्ली परिसरात धुक्याचा मोदी थर कायम असल्याचेही सांगण्यात आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App