अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका, विधिमंडळ पक्षाचे नेते लोम्बो तायेंग यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसकडे आता माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्याकडे फक्त एकच आमदार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गुजरातपाठोपाठ अरुणाचल प्रदेशातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते लोम्बो तायेंग यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला.Big blow to Congress in Arunachal Pradesh legislature party leader Lombo Tayeng joins BJP

तायेंग यांनी बाजू बदलल्याने, 2019 मध्ये 60 सदस्यीय विधानसभेत चार जागा जिंकणाऱ्या काँग्रेसकडे आता माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या रुपात फक्त एकच आमदार आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे दोन आमदार निनॉन्ग एरिंग आणि वांगलिन लोआंगडोंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.



लोम्बो तायेंग यांच्याशिवाय चकत अबो यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. चकट अबो हे तिरप जिल्ह्यातील खोंसा पश्चिम येथील अपक्ष आमदार आहेत. इटानगर येथील पक्षाच्या राज्य मुख्यालयात दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

अबो यांनी पती तिरोंग अबो जे नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) चे उमेदवार होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालांच्या घोषणेपूर्वी संशयित NSCN अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली होती. त्यानंतर पोटनिवडणुकीत चकत अबो यांनी खोंसा पश्चिम जागा जिंकली होती

Big blow to Congress in Arunachal Pradesh legislature party leader Lombo Tayeng joins BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात