राहुल यांच्या ‘न्याय’ यात्रेपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, मिलिंद देवरांनी दिला राजीनामा

आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करणार


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राहुल गांधींच्या न्याय यात्रेपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. त्यांचा एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे, अशी पोस्ट त्यांनी केली.Big blow to Congress before Rahul Gandhis Naya yatra Milind Devara resigns



माजी काँग्रेस नेत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “55 वर्षांचे जुने नाते संपुष्टात आले. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहे.”

मिलिंद देवरा हे आज, रविवारी (१४ जानेवारी) एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांचा प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे. देवरा काँग्रेस सोडून सेनेत जातील, असा अंदाज याआधीही लावला जात होता, मात्र एक दिवसापूर्वीच त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

नुकतीच काँग्रेस कार्यकारिणी जाहीर झाली तेव्हा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मिलिंद देवरा यांच्याकडे संयुक्त खजिनदारपदाची जबाबदारी दिली होती, मात्र काही दिवसांनी त्यांनी राजीनामा देऊन काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडण्याचे कारण इंडिया आघाडी असल्याचे बोलले जात आहे.

Big blow to Congress before Rahul Gandhis Naya yatra Milind Devara resigns

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात