बायडेन इस्रायलमध्ये पोहोचले; गाझातील हॉस्पिटल वरच्या हल्ल्याबद्दल मोदींचे ट्विट दोषींना शिक्षा करा!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हमास दहशतवादी संघटनेविरुद्ध इस्रायलने पुकारलेला युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इस्रायलची राजधानीतील तेल अविव मध्ये आज पोहोचले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. Biden arrives in Israel

याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण ट्विट केले. गाझामध्ये अल-अहिल हॉस्पिटल वर झालेल्या हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला ही अतिशय दुःखद घटना आहे. सध्याच्या संघर्षात सर्वसामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. ही गंभीर बाब सर्वांनी लक्षात घ्यावी. हॉस्पिटल वरच्या हल्ल्यात दोषी असलेल्यांना शिक्षा द्यावी, असे पंतप्रधानांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

अल-अहिल हॉस्पिटल वर इस्रायलने हल्ला केल्याचा दावा पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी केला. परंतु इस्रायलले ताबडतोब त्याचा खुलासा केला. हमास दहशतवाद्यांचे रॉकेट मिस्ड फायर होऊन हॉस्पिटल वर कोसळले. तिथल्या हल्ल्याशी इस्रायलचा काहीही संबंध नाही, असा स्पष्ट स्पष्ट खुलासा पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केला.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे ट्विट विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष इस्रायलच्या भूमीवर उतरले आहेत. अमेरिकन सैन्य इस्रायली सैन्याच्या मदतीला पुढे सरसावले आहे. इस्रायल देखील हमास दहशतवादी संघटने विरुद्धचे हल्ले वाढवून प्रखर करण्याच्या बेतात आहे आणि त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी ट्विट करून अल-अहिल हॉस्पिटल वरल्या हल्ल्यातील दोषींना शिक्षा करावी, असे आवाहन करणारे ट्विट केले आहे. अमेरिकेबरोबरच भारतही इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याचे ते निदर्शक आहे.

Biden arrives in Israel

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात