याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनेक देशांनी गौरव केला आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिरात, मालदीव आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे.Bhutan Prime Minister Narendra Modi honored with the highest civilian award
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भूतानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. भूतानच्या पंतप्रधानांनी ट्विट करून ही माहिती दिली.भूतानच्या या सर्वोच्च नागरी पुरस्काराचं नाव नागदेग पेल गी खोर्लो आहे. याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनेक देशांनी गौरव केला आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिरात, मालदीव आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे.
भूतानने हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना मैत्री आणि परस्पर सहकार्यासाठी दिला आहे. भूतान सरकारने सांगितले की, पंतप्रधान मोदींनी महामारीच्या काळात सहकार्य केले. त्यांनी नेहमीच मोदींना एक महान आणि आध्यात्मिक व्यक्ती म्हणून पाहिले आहे. भूतानने पंतप्रधान मोदींना देशभेटीचे निमंत्रण दिले आहे.
फेसबुकवरील आपल्या अधिकृत पोस्टमध्ये, भूतानच्या पंतप्रधान कार्यालयानं भूतानच्या राजाच्या वतीनं म्हटलं आहे की , “भूतानच्या लोकांकडून अभिनंदन.तुम्हाला एक महान आणि आध्यात्मिक व्यक्ती म्हणून पाहिले. मी वैयक्तिकरित्या हा सन्मान साजरा करण्यास उत्सुक आहे. ”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App