भूतानने केले मोदी सरकारचे कौतुक, ‘हा’ उपक्रम अद्भुत असल्याचे म्हटले


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भूतानच्या आरोग्यमंत्र्यांनी पारंपारिक औषधांसाठी पंतप्रधान नरेंद्र यांचे कौतुक केले आहे. भूतानच्या केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘पारंपारिक आणि अॅलोपॅथिक औषधांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. कारण आता जग कोरोनापासून सावरत आहे. पारंपारिक औषधांना केंद्रस्थानी आणण्यासाठी पंतप्रधान मोदींचा हा एक अद्भुत उपक्रम आहे. Bhutan praises Modi government says  initiative is wonderful

जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपारिक औषधी जागतिक संमेलनाचे गुरुवारी गांधीनगर, गुजरात येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी भूतानच्या आरोग्य मंत्री डेचेन वांगमो यांनी गुजरातमध्ये झालेल्या G20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीबद्दल सांगितले.

पारंपारिक आणि अॅलोपॅथिक औषधांच्या एकत्रीकरणासाठी मला भारताचे अभिनंदन करायचे आहे, असे त्या म्हणाल्या.  तसेच, ”पुढे जाण्यासाठी मला भारताचे अभिनंदन करायचे आहे. जग सध्या कोरोना या जागतिक महामारीतून सावरत आहे. जग सध्या आरोग्य व्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहे. पारंपारिक औषधांना केंद्रस्थानी आणण्यासाठी पंतप्रधान मोदींचा हा एक अद्भुत उपक्रम आहे. आम्ही पारंपारिक औषधांसंबंधी सर्व धोरणांसाठी आरोग्यावर चर्चा करत आहोत.” असंही त्यांनी सांगितले.

Bhutan praises Modi government says  initiative is wonderful

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात