विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोबाईलवर ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. संक्रमण कायदा अद्यादेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीसांनी त्याला अटक केली आहे. ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने देशाची चिंता चांगलीच वाढविली आहे.Beware, the young man was arrested for keeping Omaicron’s WhatsApp status
लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक मेसेज हे व्हायरल होत आहेत. काही अफवा पसरवल्या जात असतात. जोधपूर एम्समधील ऑफिस बॉयने आपल्या फोनमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते. ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याप्रकरणी या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
जोधपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बासनी पोलिसांनी त्याच्या विरोधात संक्रमण कायदा अद्यादेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तो जोधूपर एम्स रुग्णालयात ऑफिस बॉय म्हणून काम करतो.
सुनील याने ठेवलेले व्हॉटसअॅप स्टेटस अनेकांनी व्हायरल करण्यास सुरुवात केली. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासकीय कर्मचाºयांमध्येही खळबळ उडाली. प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या कोरोना कंट्रोल रूममधील फोन वाजू लागले. नागरिकांकडून या संदर्भात विचारणा होऊ लागली.
येथील डॉक्टरांनी सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या एका पोस्टची माहिती पोलीस आयुक्तांना पाठवली. ओमायक्रॉन संदर्भात काही जण अफवा पसरवत असल्याची माहिती दिली. पोलीस आयुक्त जोस मोहन यांच्या निदेर्शानुसार बसनी पोलिसांनी ऑफिस बॉय सुनीलला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App