Benjamin Netanyahu : इस्रायलने हिजबुल्लाह + हुती + हमासच्या बड्या म्होरक्यांना ठार केल्यानंतर पश्चिम आशियात शांततेविषयी मोदींची इस्रायली पंतप्रधानांशी चर्चा!!

Benjamin Netanyahu

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इस्रायलने प्रचंड हवाई हल्ले करून त्या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाह, हुती आणि हमास या दहशतवादी संघटनांच्या सर्वोच्च म्होरक्यांना ठार मारून पश्चिम आशियामध्ये दहशतवादाविरुद्ध निर्णायक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी आज फोनवरून बातचीत केली. पश्चिम आशियामध्ये लवकरात लवकर शांतता निर्माण व्हावी अशी अपेक्षा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. Benjamin Netanyahu about recent developments in West Asia

इस्रायलने लेबनान मध्ये जोरदार हवाई हल्ले करून हिजबुल्लाह संघटनेचा सर्वोच्च म्होरक्या हसन नसरल्लाह याला ठार केले. त्याच संघटनेचा दुसरा म्होरक्या नबील कौक यालाही खत्म केले. त्यानंतर इस्रायलच्या हवाई दलाने हुती दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून टाकले.

येमेन मध्ये हल्ले करून हमास दहशतवादी संघटनेचा म्होरक्या फतेह शरीफ याला देखील उडविले. इस्रायलने पश्चिम आशियातल्या मोठ्या दहशतवादी संघटना मोडीत काढण्यात निर्णायक यश मिळवले. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते खामेनी यांना “सुरक्षित स्थळी” आश्रय घेणे भाग पाडले. तरीही इस्रायलने दहशतवादाविरुद्धची मोहीम थांबवलेली नाही.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना फोन करून त्यांच्याशी बातचीत केली. जगात दहशतवादाला स्थान मिळताच कामा नये, यासाठी भारत कमिटेड असल्याचे मोदींनी सांगितले. त्याचवेळी आता पश्चिम आशियामध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे. बंधक लोकांना लवकरात लवकर सोडून दिले पाहिजे, अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली. या संदर्भात स्वतः मोदींनी ट्विट करून इस्रायली पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली.

Benjamin Netanyahu about recent developments in West Asia

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात