Bengal Violence : बंगालमध्ये निवडणुका संपल्यानंतरही हिंसाचार थांबलेला नाही. आता बंगालच्या पश्चिम मिदनापूरमध्ये केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या कारवर तृणमूल समर्थकांनी हल्ला केला आहे. स्वत: मुरलीधरन यांनी ही माहिती ट्विट केली आहे. या हल्ल्यासाठी त्यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे. Bengal Violence Trinamool goons attack Minister of State for External Affairs Muralitharan’s convoy
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : बंगालमध्ये निवडणुका संपल्यानंतरही हिंसाचार थांबलेला नाही. आता बंगालच्या पश्चिम मिदनापूरमध्ये केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या कारवर तृणमूल समर्थकांनी हल्ला केला आहे. स्वत: मुरलीधरन यांनी ही माहिती ट्विट केली आहे. या हल्ल्यासाठी त्यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे.
वास्तविक, अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पक्षातील कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांना सावरण्यासाठी बंगालमध्ये जात आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आज पश्चिम मिदनापूर येथील भाजप कार्यकर्त्याला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात होते. तेवढ्यात त्यांच्या ताफ्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्यात आला. यादरम्यान त्यांच्या वाहनाच्या काचाही फुटल्याचे व्हिडिओ स्पष्ट दिसते.
https://twitter.com/VMBJP/status/1390209778798923778?s=20
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुरलीधरन यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘लाखो लोकांना घर सोडावे लागले, कारण त्यांच्या घरावर हल्ला झाला. घरे जाळण्यात आली. ही लोकशाही नाही. परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांच्यावर आज ज्या प्रकारे हल्ला झाला आहे, त्यावरून बंगाल सरकारने लोकशाहीला लाज आणली आहे. मंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय होईल. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी. ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात यापूर्वी अशा हल्ल्याची धमकी दिलीच होती.
बंगालमधील निवडणुका संपल्यानंतरही सातत्याने हिंसाचार सुरू आहे. निवडणुकीच्या निकालानंतर गृह मंत्रालयाने नियुक्त केलेले 4 सदस्यीय पथक, अतिरिक्त सचिव-स्तरीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, हिंसाचारानंतरच्या वास्तव परिस्थितीचे आकलन करण्यासाठी आज कोलकाता येथे दाखल झाले आहे.
Bengal Violence Trinamool goons attack Minister of State for External Affairs Muralidharans convoy
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App