विशेष प्रतिनिधी
कोलकता : पश्चिम बंगालमध्ये waqf board समर्थक आणि सुधारणा कायदा विरोधातील मुस्लिमांनी मुर्शिदाबाद जिल्हा पाठोपाठ 24 परगणा जिल्ह्यात हिंसाचार माजवला असून पोलिसांची वाहने पेटवण्यापर्यंत त्यांची मजल गेली. मुर्शिदाबाद मध्ये पॅरामिलिटरी फोर्सने संचलन करत तिथला हिंसाचार आटोक्यात आणला. हिंसाचार करून जाळपोळ करणाऱ्या 150 मुस्लिम आंदोलकांना अटक केली. त्या पाठोपाठ मुर्शिदाबाद मधली परिस्थिती सामान्य बनायला सुरुवात झाली. तिथून पलायन केलेले 19 परिवार परत आपल्या घरात गेले.
एकीकडे पॅरामिलिटरी फोर्सच्या कठोर कारवाईनंतर मुर्शिदाबाद शांत होत असताना दुसरीकडे waqf सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लिम आंदोलकांनी 24 परगणा जिल्हा पेटवायचा प्रयत्न केला. त्यांनी आमदार नौशाद सिद्दिकी याच्या नेतृत्वाखाली कलकत्त्यावर चालून जायचा आव आणला.
पण पोलिसांनी बांगर, मियाखान आणि संदेशखली परिसरामध्ये मोठमोठे बॅरिकेट्स लावून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात चिथावणीखोर घोषणा देत पोलिसांचीच वाहने पेटवून दिली. पोलिसांनी तिथे देखील पॅरामिलिटरी फोर्सची मदत मागितली.
पॅरामिलिटरी फोर्सने मुर्शिदाबाद मधल्या हिंसाचारग्रस्त भागामध्ये आज संचलन करून तिथली परिस्थिती सामान्य करायचा प्रयत्न केला. त्याचवेळी कठोर कारवाई करून त्यांनी हिंसाचार करणाऱ्या 150 आंदोलकांना अटक केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App