वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात रामपुरहाट मध्ये जिहादी दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या 13 जणांचा न्याय व्यवस्थितच झाला पाहिजे. या संदर्भातली केस डायरी 24 तासाच्या आत कोर्टापुढे सादर करा. प्रत्यक्ष घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावून 24 तास निगराणी करा. कोणत्याही स्थितीत पुराव्यांशी छेडछाड होता कामा नये. त्याचबरोबर या घटनेची संबंधित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी आणि संबंधित व्यक्तींना पुरेसे संरक्षण द्या, असे स्पष्ट आदेश कोलकता हायकोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत.Bengal Jihadi Terrorism: File case diary in 24 hours, install CCTV camera, don’t tamper with evidence !!; Kolkata High Court orders Mamata Banerjee
रामपुरहाट मध्ये तृणमुल काँग्रेसचा नेता भादू शेख याच्या हत्येनंतर त्याच्या जिहादी समर्थकांनी 13 जणांना घरांमध्ये कोंडून जिवंत जाळले. या प्रकरणाची भयानकता ओळखून कोलकता हायकोर्टाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली आणि त्यावर आधारित ममता बॅनर्जी यांच्या सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कोणत्याही स्थितीत पुराव्यांशी छेडछाड होता कामा नये. सीसीटीव्ही कॅमेरा घटनास्थळी लावून संपूर्ण निगराणी 24 तास केली पाहिजे. त्याची जबाबदारी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट वर असेल. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला राज्य सरकारने सर्व सुविधा पुरवाव्यात. 24 तासाच्या आत केस डायरी कोलकता हायकोर्ट समोर आली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश कोलकता हायकोर्टाने देऊन ममता बॅनर्जी यांच्या सरकारला झटका दिला आहे.
बंगाल धुमसतोय
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवल्यानंतर सरकारच्या नाकाखाली जिहादी दहशतवादाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट मध्ये लोकांची घरे पेटवून देऊन 13 जणांना जिवंत जाळून हत्या केल्यानंतर बंगाल धुमसतोच आहे.
West Bengal | A BJP delegation, led by LoP Suvendu Adhikari, visits Rampurhat in Birbhum. Eight charred bodies were found here yesterday when houses were set on fire, hours after the murder of a local TMC leader. pic.twitter.com/8RnHxvffkj — ANI (@ANI) March 23, 2022
West Bengal | A BJP delegation, led by LoP Suvendu Adhikari, visits Rampurhat in Birbhum. Eight charred bodies were found here yesterday when houses were set on fire, hours after the murder of a local TMC leader. pic.twitter.com/8RnHxvffkj
— ANI (@ANI) March 23, 2022
पण रामपुरहाट मधील प्रकरण समोर येण्याअगोदर बंगालमध्ये जिहादी दहशतवाद्यांनी 26 राजकीय हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत फक्त आठवडाभरात झालेल्या राजकीय हत्यांचा हा आकडा आहे. त्याच वेळी रामपुरहाट मध्ये लोकांची घरे पेटवून देऊन 13 लोकांना जिवंत जाळण्यात आले, या प्रकरणातला प्रत्यक्षदर्शी व्यक्ती गायब झाला आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी या संदर्भात केस देखील दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
बंगाल मधील या भयानक जिहादी हिंसाचाराची कोलकत्ता हायकोर्टाने दखल घेतली असून आज दुपारी 2.00 वाजता या प्रकरणावर सुनावणी ठेवली आहे. सध्या सुनावणी सुरू आहे. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी सरकारला हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे.
रामपुरहाट मधून पलायन
ज्या रामपुरहाट मध्ये तृणमुल काँग्रेसचा स्थानिक नेता भादू शेख यांच्या हत्येनंतर भादू शेखच्या जिहादी समर्थकांनी 10 लोकांना घरात कोंडून जिवंत जाळून मारून टाकले. या भयानक हिंसक घटनेनंतर रामपुरहाट मधून लोक पलायन करत असून पश्चिम बंगालमध्ये अन्यत्र देखील याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हायकोर्टाने या सगळ्या प्रकाराची दखल घेतली असून ममता बॅनर्जी सरकारला आपली भूमिका ताबडतोप मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आज दुपारी 2.00 वाजता रामपुरहाट जळीत कांडाची सुनावणी हायकोर्टात होणारा आहे.
भाजपचे शिष्टमंडळ रामपुरहाट मध्ये
तत्पूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे एक शिष्टमंडळ रामपूरहाट दौऱ्यावर रवाना झाले आहे. खासदार अर्जुन सिंग, खासदार जगन्नाथ सरकार हे देखील शुभेंदू अधिकारी यांच्याबरोबर या दौर्यात समाविष्ट आहेत. ही शिष्टमंडळ रामपुरहाट मधून होणारे पलायन रोखण्याचा प्रयत्न करेल तसेच पीडितांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेल.
राष्ट्रपती राजवटीची मागणी
पश्चिम बंगालमध्ये हा भडका हिंसाचार लक्षात घेऊन काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. दुपारी 2.00 वाजता हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत नेमके काय होणार आणि कोलकत्ता हायकोर्ट पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी सरकारला कोणते आदेश देणार?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App