Sukanya Samriddhi Scheme : दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या कुटुंबाच्या किंवा मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाटी गुंतवणूक हीदेखिल महत्त्वाची असते. गुंतवणुकीचे अनेक पर्याय आपल्यासमोर खुले आहेत. पण अशा काही सरकारी योजनादेखिल असतात, ज्यात गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळू शकतो आणि भविष्याची चिंताही कमी होऊ शकते. अशीच एक चांगली योजना म्हणजे, पोस्टातर्फे चालवली जाणारी सुकन्या समृद्धी योजना. या योजनेमध्ये चांगल्या परताव्याबरोबरच अनेक सुविधाही मिळत आहेत. सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये दरवर्षी किमान 250 रुपयांची रक्कम जमा करावी लागेल. तर याची कमाल मर्यादा दीड लाखांपर्यंतची आहे. जर लाभार्थ्याने एखाद्या वर्षी रक्कम जमा केली नाही तर त्याचे अकाऊंट बंद होते. पण ते दंड भरून पुन्हा सुरू देखिल करता येते. Benefits of Sukanya Samriddhi Scheme for investment
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App