मीडिया कव्हरेजसाठी केली होती विनंती ; घटनेमागे खरा सूत्रधार वेगळाच
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेत घुसून गोंधळ घातल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. दोन तरूण संसदेच्या आत आणि दोन संसदेच्या बाहेर होते. याशिवाय ललित झा हा आणखी एक व्यक्ती होता, जो संसदेबाहेर झालेल्या गदारोळाचा व्हिडिओ बनवत होता. घटनेचा व्हिडिओ बनवल्यानंतर ललित घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस अद्याप त्याचा शोध घेत आहेत.Before fleeing from Parliament Lalit had made a video and sent it to a friend
दरम्यान, संसदेतील गोंधळ प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पळून जाण्यापूर्वी ललितने एक व्हिडिओ बनवला होता आणि तो त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता. ललितने मीडिया कव्हरेजची मागणी केली होती .
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा खरा सूत्रधार कोणीतरी दुसराच असल्याचे दिल्ली पोलिसांचे मत आहे. म्हणजेच जे चार जण पकडले गेले आहेत आणि ललित झा फरार आहेत. या पाच जणांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे जो या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App