भारत हिंदू राष्ट्रच कारण भारताचा प्रत्येक नागरिक हिंदू!!; योगी आदित्यनाथांचे निःसंदिग्ध प्रतिपादन

प्रतिनिधी

लखनऊ : भारत हिंदू राष्ट्र होते. हिंदू राष्ट्र आहे आणि भविष्यातही हिंदू राष्ट्र राहील. कारण हिंदू शब्द कोणत्याही मजहब, मत अथवा धर्मसंप्रदायाचे नाव नाही, तर भारताची सांस्कृतिक ओळख आहे, असे निःसंदिग्ध प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एबीपीच्या संवाद कार्यक्रमात केले आहे. त्याचवेळी त्यांनी भारताचे संविधान आपले सर्वोच्च मार्गदर्शक असल्याचेही स्पष्ट केले आहे. Because India is a Hindu nation, every citizen of India is a Hindu.

रुबिका लियाकत यांनी हिंदू राष्ट्रा संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, की हिंदू राष्ट्र या शब्दाचा नेमका अर्थ काय हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. हिंदू शब्द जर मजहब मत, पंथ अथवा संप्रदायाशी जोडून घेतला तर ते योग्य नाही. कारण हिंदू हा शब्द भारताची सांस्कृतिक ओळख आहे. एखादी मुस्लिम व्यक्ती हज यात्रेला जाते, तेव्हा त्या व्यक्तीची तिथे ओळख मुस्लिम म्हणून नाही, तर हिंदू म्हणून केली जाते. त्याविषयी कोणाला आक्षेप राहत नाही. पण भारतात हिंदू शब्दाला काही लोक आक्षेप घेतात.

पण हिंदू हा शब्द कोणताही मत, पंथ मजहब अथवा संप्रदायाशी जोडलेला नाही. तर भारताची जी सांस्कृतिक विरासत आहे तिच्याशी संबंधित आहे. या अर्थाने भारताचा प्रत्येक नागरिक हा हिंदू आहे. हिमालयापासून समुद्रापर्यंतच्या भूमीपर्यंत भारतात जन्माला येतो तो हिंदू आहे. त्यामुळे भारत भूतकाळात हिंदू राष्ट्र होता. वर्तमान काळात हिंदू राष्ट्र आहे आणि भविष्यातही हिंदू राष्ट्र राहील, असे उत्तर योगी आदित्यनाथ यांनी दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हवाला देऊन रुबिया लियाकत यांनी भारताचे संविधान आमचे मार्गदर्शक आहे, असे अमित शहा म्हणाले होते, त्याचे काय?, असा सवाल केल्यावर योगी आदित्यनाथ म्हणाले, भारताचे संविधान हे आमचे मार्गदर्शक आहे. या विषयी कोणतीही शंका नाही. कारण भारताचे संविधान देखील कोणतेही मत, पंथ संप्रदाय अथवा मजहब यांच्या पलिकडचे सगळ्यांना सामावून घेणारे आहे. त्यामुळे संविधान सर्व भारत यांचे मार्गदर्शकच आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

Because India is a Hindu nation, every citizen of India is a Hindu.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात