वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात १३ एप्रिलपासून सलग ४ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेची महत्त्वाची कामे असतील, तर उद्या म्हणजेच सोमवारी (१२ एप्रिल) पूर्ण करून घ्या. कारण उद्या कामं पूर्ण नाही केली तर तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागेल. Banks will remain closed for 4 consecutive days from April 13
खरंतर एप्रिलमध्ये एकूण 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. या आठवड्यात बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत बँकाच्या सुट्या लक्षात घेऊन बँकेतील सर्व काम करणे आवश्यक आहे.
सर्व राज्यांत एकसमान नियम नाहीत
सर्व राज्यात बँकाना एकसमान सुट्या नाहीत. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरा होत नाही. आरबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, एप्रिलमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये ९ दिवस बँका बंद राहणार आहेत.
बँकेच्या सुट्याची यादी
सणांमुळे बँका राहणार बंद
तेलुगू नववर्ष, बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव आणि उगाडी या सणानिमित्त 13 एप्रिल रोजी बँकेला सुटी असेल. तर दुसर्या दिवशी 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बँका बंद राहणार आहेत. 15 एप्रिल रोजी हिमाचल दिन, विशु, बंगाली नववर्ष, सरहुल निमित्त काही राज्यांमध्ये सुटी असणार आहे. 21 एप्रिलला रामनवमी आणि 25 एप्रिलला महावीर जयंतीची सुटी असेल. तसेच 24 एप्रिल रोजी चौथा शनिवार असल्यानं त्या दिवशीही सुटी असणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App