कोरोनावर उपचारासाठी मोठ्याा प्रमाणावर खर्च होत आहे. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट आले आहे. त्यांच्या मदतीसाठी सरकारी बॅँका धावून आल्या आहेत. कोरोना रुग्णांना उपचारासाठी सरकारी बॅँकांकडून वैयक्तिक कर्ज मिळणार आहे.Banks will provide personal loans for treatment of corona
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनावर उपचारासाठी मोठ्याा प्रमाणावर खर्च होत आहे. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट आले आहे. त्यांच्या मदतीसाठी सरकारी बॅँका धावून आल्या आहेत. कोरोना रुग्णांना उपचारासाठी सरकारी बॅँकांकडून वैयक्तिक कर्ज मिळणार आहे.
कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयांचे खूप बिल येत आहे. लॉकडाऊनमध्ये अगोदरच आर्थिक तंगीमध्ये असलेल्यांना उपचार कसे करून घ्यायचे हा प्रश्न सतावत आहेत. कोरोनाच्या उपचारासाठी दहा ते पंधरा दिवस रुग्णालयात राहिले
तर किमान दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. कोरोना संसर्गजन्य असल्याने अनेकदा एकाच कुटुंबातील तीन ते चार सदस्यही बाधित होतात. त्यांच्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज दिले जाणार असल्याची घोषणा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक असोसिएशनने केली आहे.
सरकारी बँका कोरोना उपचारासाठी पैशांची गरज असल्यास असुरक्षित वैयक्तिक कर्ज देणार आहेत. यामध्ये 25 हजारांपासून 5 लाखांपर्यंत हे अर्थ सहाय्य सॅलरीड, नॉन सॅलरीड आणि पेन्शनधारकांना दिले जाणार आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी देखील हेल्थकेअर बिझनेस लोन पुरविले जाणार आहे.
त्याचबरोबर हॉस्पिटलना 2 कोटींपर्यंतचे कर्ज 7.5 टक्का व्याजदराने दिले आहे. यामध्ये नर्सिंग होम, ¸ऑक्सिजन प्लँटसाठी 100 टक्के गॅरंटीसह हे कर्ज दिले जाणार आहे. याचसोबत हेल्थकेअर सुविधांसाठी 100 कोटींपर्यंतचे कर्ज कंपन्यांना त्यांच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी दिले जाणार आहे.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी दिले जाणारे पर्सनल लोन हे माफक व्याजदरात दिले जाणार आहे. तसेच ही योजना व्यापकपणे राबविण्यासाठी नियम आणि अटी देखील सरकारी बँकांनी एकत्र येऊन ठरविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App