बँकेच्या कामांचा खोळंबा होवू नये म्हणून नागरिकांनी आधीच नियोजन करणे सोयीचे राहणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Banks मार्च महिन्यात होळीचा सण येत आहे. यासोबतच रमजान महिनाही सुरू आहे. महिन्याच्या शेवटी ईद-उल-फित्र असते. यामुळे मार्च महिन्यात भरपूर सुट्ट्या असतात.Banks
मार्च महिन्यात जर तुमचे बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर ते लवकर पूर्ण करा, अन्यथा बँकेच्या सुट्ट्यांमुळे तुमचे काम अपूर्ण राहू शकते.
मार्च महिना हा बँका, बचत योजना, आयकर इत्यादी विविध आर्थिक योजनांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या महिन्यात बँका १० दिवस बंद राहणार आहेत. शिवाय, ऑल इंडिया बँक कॉन्फेडरेशनच्या आवाहनावरून दोन दिवसांचा संपही होणार आहे.
२४ आणि २५ मार्च रोजी हा संप प्रस्तावित आहे. अशा परिस्थितीत, सर्वसामान्यांना त्यांच्या बँकेच्या कामकाजाचे नियोजन आधीच करणे सोयीचे राहील. मार्च महिन्याच्या शेवटी रविवार आणि ईदनिमित्त सुट्टी देखील असते.
एसबीआय ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस अमरेश विक्रमादित्य म्हणाले की, २, ९, १६, २३ आणि ३० मार्च रोजी रविवारची सुट्टी आहे. तर ८ आणि २२ मार्च रोजी दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे. १४ आणि १५ मार्च रोजी होळीची सुट्टी आहे. याशिवाय ईदमुळे ३१ मार्च रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App