भारत आणि महाराष्ट्राप्रमाणेच बांगलादेशातही उदभवली नवी NCP!!… भारतात ज्याप्रमाणे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी राजकीय फारकत घेऊन शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते फोडून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी NCP काढली होती, तशाच आशयाचे नाव असलेली स्वतंत्र राजकीय पार्टी अथवा पक्ष बांगलादेशातल्या विद्यार्थी संघटनांनी काढला आहे. त्याचे नावही राजकीय योगायोगाने नॅशनल सिटीजन पार्टी अर्थात NCP असेच दिले आहे. Bangladeshi
– पवारांची प्रेरणा नाही
वास्तविक बांगलादेशातल्या नॅशनल सिटीजनस पार्टी म्हणजेच NCP या पक्षाच्या स्थापनेत शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी अर्थात NCP शी थेट कुठला संबंध नाही किंवा बांगलादेशात NCP स्थापन करणाऱ्यांनी शरद पवार किंवा अन्य भारतीय नेत्यांकडून प्रेरणा घेतली, असेही समजायचे कारण नाही. पण बांगलादेशातील ज्या घटकांनी एकत्र येऊन आणि ज्या उद्देशाने NCP स्थापन केली आहे ते समजून घेतले तर बरेच काही वेगळे खुलासे होतील.
बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली २०२४ मध्ये जे उत्पात घडविणारे आंदोलन झाले, ज्यामध्ये अल्पसंख्यांक हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध यांच्यावर हल्ले करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यात आले, त्या विद्यार्थी आंदोलनाचा नेता नाहिद इस्लाम हा बांगलादेशातल्या नॅशनॅलिस्ट सिटीझन पार्टी अर्थात NCP चा निमंत्रक म्हणजेच सर्वेसर्वा आहे. बांगलादेशातील प्रस्थापित राजकीय पक्ष शेख हसीना वाजेद यांची अवामी लीग, बेगम खालिदा झिया यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि अन्य स्थानिक राजकीय पक्ष यांना वगळून बांगलादेशाला पूर्णपणे नवीन राजकीय सामाजिक आणि आर्थिक मार्गावर नेण्यासाठी नॅशनल सिटीजन पार्टीची म्हणजेच NCP ची स्थापना करण्यात आल्याची घोषणा नाहिद इस्लामने केली. बांगलादेशात आत्तापर्यंत घराणेशाही, भ्रष्टाचार, नोकरशाही यांच्यामुळे वंचित राहिलेल्या सर्व समाज घटकांना सामावून घेऊन बांगलादेशात संपूर्णपणे नव्या पद्धतीची राज्यघटना रचना करण्याचा इरादा नाहिद इस्लाम याने NCP स्थापन करताना बोलून दाखविला.पण त्याने आपल्या टीम मध्ये १० विद्यार्थी आंदोलन नेत्यांना सामील करून घेतले. हे सगळे मुस्लिम आहेत यामध्ये कोणीही हिंदू, बौद्ध किंवा ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समुदायापैकी नाही.
बांगलादेशाच्या स्थापनेपासून त्या देशात घराणेशाही भ्रष्टाचार नोकरशाह यांनी थैमान घातले. लष्कराने प्रत्येक नागरी कारभारामध्ये तोंड खूपसले. त्यामुळे बांगलादेशाची अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही आणि देशातल्या सगळ्या समाज घटकांना न्याय मिळू शकला नाही. देशातला बहुसंख्य समाज उपेक्षित अडाणी आणि वंचित राहिला. या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देणारा आणि मध्यम मार्ग अवलंबणारा राजकीय पक्ष नॅशनॅलिस्ट सिटीझन पार्टी अर्थात NCP नावाने उदयाला आल्याची घोषणा नाहिद इस्लामने केली.
– जमाते इस्लामीचा इंधनपुरवठा
बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनाला जमाते इस्लामी या कट्टर जातीयवादी संघटनेने सर्व प्रकारचा इंधनपुरवठा केला होता. त्यामध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI चा देखील हात होता, इतकेच काय पण deep state ने नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या साह्याने बांगलादेशात खोलवर असंतोषाची बीजे पेरली होती. याचा परिपाक म्हणूनच बांगलादेशातल्या जनतेने निवडून दिलेले शेख हसीना यांचे सरकार विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली उखडून फेकले गेले. शेख हसीनांना भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर बांगलादेशात जिहादी कट्टरतावाद्यांनी धुमाकूळ घातला. वंगबंधू शेख मजीबूर रहमान यांचे नाव इतिहासातून कायमचे पुसण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला काळीमा फासला. हे सगळे विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली घडविण्यात आले.
आता ज्यावेळी बांगलादेशात लोकशाही पुनर्स्थापनेची आणि शेख हसीना पुन्हा बांगलादेशात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तोच बांगलादेशात प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात आवाज उठवणारा एक राष्ट्रीय पक्ष म्हणून NCP काढण्यात आल्याचा दावा करण्यात येतो आहे. या पक्षाच्या मागे उभ्या असणाऱ्या सर्व शक्ती या जिहादी कट्टरतावादी आणि पाकिस्तानच्या हातातले खेळणेच आहेत, नव्या पक्षाचे नाव जरी नॅशनल सिटीजन पार्टी अर्थात NCP असे गोड गुलाबी असले आणि ते वरवर लोकशाहीवादी वाटत असले, तरी संबंधित पक्ष स्थापन करणारे आणि चालविणारे दोन्हीही जिहादी कट्टरतावादी बांगलादेशाला नव्या खड्ड्यात घालण्याच्या बेताला लागले आहेत. कारण या पक्षाची राजकीय आणि सामाजिक पाळेमुळे बांगलादेशात धुडगूस घालणाऱ्या जातीय नागरिक कमिटी मध्येच आहेत. सगळ्या घटना घडामोडींचा अर्थ फारसे between the lines न वाचता ही समजण्यासारखा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App