Bangladesh : दक्षिण बांगलादेशात शुक्रवारी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लागलेल्या आगीत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता स्थानिक पोलिसांनी व्यक्त केली आहे. राजधानी ढाकापासून 250 किमी अंतरावर असलेल्या झलकोटी जिल्ह्यात सुगंधा नदीत बोटीच्या इंजिनला आग लागल्याने ही दुर्घटना घडली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. Bangladesh At least 36 people killed, over 200 injured in fire in boat carrying passengers
वृत्तसंस्था
ढाका : दक्षिण बांगलादेशात शुक्रवारी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लागलेल्या आगीत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता स्थानिक पोलिसांनी व्यक्त केली आहे. राजधानी ढाकापासून 250 किमी अंतरावर असलेल्या झलकोटी जिल्ह्यात सुगंधा नदीत बोटीच्या इंजिनला आग लागल्याने ही दुर्घटना घडली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
36 people dead after massive fire breaks out aboard a ferry in southern Bangladesh: officials — Press Trust of India (@PTI_News) December 24, 2021
36 people dead after massive fire breaks out aboard a ferry in southern Bangladesh: officials
— Press Trust of India (@PTI_News) December 24, 2021
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नदीच्या मध्यभागी बोटीला आग लागली. प्रशासनाने किमान 36 मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. आगीत भाजल्याने बहुतांश लोकांचा मृत्यू झाला तर काहींनी जीव वाचवण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. या आगीच्या घटनेत 200 हून अधिक लोक होरपळले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बरगुनाकडे जाणारी ‘एमव्ही अभिजन-10’ ही बोट शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 वाजता इंजिन रूमला धडकली. ही बोट ढाक्याहून निघाली होती. अग्निशमन सेवा नियंत्रण कक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माहिती मिळाल्यानंतर पहाटे 3:50 वाजता अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आणि पहाटे 5:20 पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी 9 वाजेपर्यंत किमान 90 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शोध मोहीम अजूनही सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सांगितले की, आग इंजिन रूममध्ये लागली, जी नंतर बोटीच्या उर्वरित भागात पसरली.
Bangladesh At least 36 people killed, over 200 injured in fire in boat carrying passengers
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App