जाणून घ्या, भारतासोबतच्या संबंधाबाबत बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी नेमकं काय म्हटलं?
विशेष प्रतिनिधी
ढाका : बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी देशात शांतता आणि स्थैर्य राखण्याचे आवाहन केले आहे. स्थिरता आणि विकासाला चालना देणारी राष्ट्रीय सहमतीची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी एका मुलाखतीत देशातील सद्यस्थिती आणि शेजारी देशांशी असलेले संबंध यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी मोहम्मद युनूसच्या अंतरिम प्रशासनातील पोलिसांच्या अपयशावर चिंता व्यक्त केली आणि देशातील शांतता, सुशासन आणि विकासासाठी राजकीय पक्षांच्या सक्रिय भूमिकेवर भर दिला.
Sharad Pawar : गुरुने दिला शरणागतीचा वसा; चला पुतण्याच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसा!!
जनरल वकार म्हणाले की, बांगलादेशची अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकासासाठी शांतता आणि स्थिरता आवश्यक आहे. ते म्हणाले, “शांतता आणि स्थैर्याशिवाय विकास आणि सुशासन शक्य नाही. आपल्याला परस्पर सहिष्णुता वाढवावी लागेल आणि सलोख्याच्या दिशेने पावले टाकून राष्ट्रीय सहमतीचे वातावरण निर्माण करावे लागेल.”
भारतासोबतच्या संबंधांवर वक्तव्य करताना ते म्हणाले की, भारत आणि बांगलादेश यांच्यातील परस्परावलंबन महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की भारत आणि बांगलादेश या दोघांनाही त्यांच्या सुरक्षा, आर्थिक क्रियाकलाप आणि इतर गरजांसाठी एकमेकांवर अवलंबून राहावे लागेल. संबंध चांगले राहणे हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. तसेच ते म्हणाले की, आम्ही आमच्या कोणत्याही शेजारी देशासोबत त्यांच्या सामरिक हिताच्या विरोधात असे काहीही करणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App