वृत्तसंस्था
बंगळुरू : बंगळुरूच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या बॉम्बस्फोटात नऊ जण जखमी झाले. यात सात ग्राहक आणि दोन कॅफे कर्मचारी आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा आयईडी स्फोट असू शकतो, अशी भीती व्यक्त केली. ते म्हणाले, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती स्फोटापूर्वी बॅग ठेवताना दिसत आहे. दोषींना कठोर शिक्षा होईल. डीजीपी आलोक मोहन म्हणाले, घटनास्थळी काही बॅटरी सापडल्याचे समोर आले आहे.Bangalore Rameswaram Cafe Bomb Blast: Nine Injured, Suspect Spotted on CCTV Keeping Bags
पोलिसांच्या एफएसएल पथकाकडून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. एनआयए आणि आयबीचे पथकही घटनास्थळी पोहोचणार आहे. हा दहशतवादी हल्ल्याचा कट असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात व्यावसायिक स्पर्धेच्या अँगलनेही तपास केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येदियुरप्पा यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App