विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – बांगलादेश आता ‘जिहादीस्तान होत चालला आहे. शेख हसीना सरकार हे राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करत आहेत आणि मदरशातून कट्टरपंथीय तयार होत आहेत. बांगलादेशमधील हिंदू आणि मंदिरावरील हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. परंतु भारतातील कथित धर्मनिरपेक्ष म्हणून समजले जाणाऱ्या नेत्यांनी या हिंसेबाबत अवाक्षरही काढले नसल्याबद्दल बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आश्चवर्य व्यक्त केले आहे.Bangaladesh becoming Jihadistan – Taslima Nassarin
Nusrat Jahan controversy ! नुसरत जहां गर्भवती; पती निखील जैन यांना माहितीच नाही ! लेखिका तस्लीमा नसरीनची पोस्ट व्हायरल
बांगलादेशमध्ये मंदिर आणि हिंदू नागरिकांवर हल्ले होत असल्याबद्दल तस्लिमा नसरीन यांनी खंत व्यक्त केली आहे. भारतात अल्पसंख्याकांच्या हिताबद्दल बोलणारे बांगलादेशच्या अल्पसंख्यांकाबद्दल का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे. बांगलादेशच्या आतापर्यंतच्या सरकारांनी धर्माचा केवळ राजकीय लाभासाठीच उपयोग केला आहे. त्यांनी इस्लाम धर्माला राजधर्माचा दर्जा दिला आहे. तेथे हिंदू आणि बौद्धांची स्थिती दयनीय झाली आहे, असे तस्लिमा नसरीन म्हणाल्या.
हिंदूविरोधी भावना ही बांगलादेशमध्ये नवीन नाही. आता दहशतीमुळे उरलेसुरले हिंदू देखील तेथे राहणार नाहीत. सरकारने ठरवले असते तर त्यांचे संरक्षण करता आले असते. हिंदुविरोधी मानसिकता चिंताजनक आहे. फाळणीच्या काळात तीस टक्के अल्पसंख्याक होते. आता ९ टक्केच राहिले आहेत. आगामी काळातही यात आणखी घसरण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App