वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उद्या २२ जुलैच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भारतात #BakraLivesMatter, ट्विटरवर ट्रेंडिंग झाला आहे. कुणाचे रक्त सांडून ईद साजरी करू नका. हिरवी बकरी ईद साजरी करा, प्राण्यांना मारून ईदचा आनंद मिळू शकत नाही वगैरे प्रतिक्रिया ट्विटरवर नेटिझन्सनी दिल्या आहेत. मुख्य म्हणजे या ट्विटर ट्रेंडिंगमध्ये मुस्लीम नेटिझन्सचाही समावेश आहे. BakraLivesMatter Eid must be ban in every civilise country
https://twitter.com/vikram_aditya_7/status/1417331591815208963?s=20
प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आपण एकत्र येऊन बोलले पाहिजे. त्यांना देखील जगण्याचा हक्क आहे. कोणतेही प्राणी हे मानवाच्या प्रयोगाची, खाण्याची, फॅशनची किंवा करमणूकीची साधने नव्हेत, अशा प्रतिक्रिया देखील प्राणीप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत. #vegan आणि #animalrights हे हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंडिंग आहेत.
https://twitter.com/_YaYavar_/status/1417331029564542982?s=20
त्याच वेळी अनेकांनी peta संस्थेला उद्देशून प्रश्न विचारले आहेत. सनातन धर्मावर निशाणा साधताना पेटा संस्थेला अनेक बहाणे मिळतात. पण बकरी ईदच्या कुर्बानीच्या वेळी ते का गप्प बसतात, असा सवाल अनेकांनी विचारला आहे. सनातन धर्माला प्राणीप्रेम शिकविण्याची गरज नसल्याचे अनेकांनी पेटाला सुनावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App