जाणून घ्या, नेमकं कशामुळे ‘NADA’ने हे कठोर पाऊल उचललं? Bajrang Punia suspended by NADA Paris will break the Olympic dream
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचा स्टार ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणे कठीण वाटत आहे. कारण रविवारी, ५ मे रोजी ‘नाडा’ने या स्टार कुस्तीपटूची डोप चाचणी न केल्याने कारवाई करत त्याला निलंबित केले. या कठोर पावलामुळे बजरंग पुनिया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
विनेश फोगटने खेलरत्न-अर्जुन पुरस्कार परत केले; बजरंग पुनिया म्हणाला- महिला कुस्तीपटूंसाठी सर्वात वाईट काळ
राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने बजरंग पुनियाला निलंबित केले आहे. ‘नाडा’ने हा निर्णय घेतल्यानंतर आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या त्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. डोप सॅम्पल न दिल्याने NADA ने बजरंग पुनियाला निलंबित केले.
या वर्षी मार्चमध्ये सोनीपत येथे झालेल्या चाचणीनंतर बजरंग पुनियाने डोप चाचणी दिली नाही. आता त्याच्यावरील ही बंदी उठवली गेली नाही तर पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम चाचण्यांमध्ये तो भाग घेऊ शकणार नाही.
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारतासाठी ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले आहे. २०२० मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याने ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App