‘’बजरंग दल धमक्यांना घाबरत नाही’’, कर्नाटकात काँग्रेसच्या बंदी घालण्याच्या घोषणेवर ‘विहिंप’चे प्रत्युत्तर!

‘’ हिंदूंच्या द्वेषामुळे काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घातली तर…’’ असा सूचक इशाराही विहिंपने दिला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसच्या निवडणूक प्रचारादरम्यान बजरंग दलावर बंदी घालण्याच्या घोषणेनंतर, आता विश्व हिंदू परिषदेनेही (व्हीएचपी) प्रत्युत्तर  दिले आहे., ‘’बजरंग दल बंदीच्या या धमकीला घाबरत नाही.’’ असे विश्व हिंदू  परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. Bajrang Dal is not afraid of threats VHP reply to Congress ban announcement in Karnataka

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पक्ष सत्तेवर आल्यास बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) सारख्या संघटनांवर राज्यात बंदी घालण्यात येईल, असे जाहीर केले होते यावर विहिंपचे केंद्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे म्हणाले की, ‘’हिंदूंच्या द्वेषामुळे काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घातली तर आवश्यक ती पावले उचलली जातील. रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान बजरंग दलावर बंदी घालण्यात आली होती, पण ती चुकीची असल्याचे सांगत न्यायालयाने ती रद्द केली होती.’’

याबाबत काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी नंतर स्पष्ट केले की, बजरंग दलावर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि द्वेषाचे राजकारण थांबवणे हे काँग्रेसचे ध्येय आहे. मोईली पुढे म्हणाले की, कोणत्याही संघटनेवर बंदी घालणे राज्य सरकारला शक्य नाही. बजरंग दलावर कर्नाटक सरकारची बंदी शक्य नाही.

Bajrang Dal is not afraid of threats VHP reply to Congress ban announcement in Karnataka

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात