‘गीता प्रेस’चे विश्वस्त बैजनाथ अग्रवाल यांचे निधन; मुख्यमंत्री योगी यांनी व्यक्त केला शोक

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचा विश्वस्त म्हणून गौरव केला होता.

विशेष प्रतिनिधी

गोरखपूर  : येथील गीता प्रेसचे विश्वस्त बैजनाथ अग्रवाल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. १९५०मध्ये ते गीता प्रेस ट्रस्टमध्ये रुजू झाले होते. शहरातील सिव्हिल लाईन्स येथील हरिओमनगर येथील राहत्या घरी शुक्रवारी रात्री वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचा विश्वस्त म्हणून गौरव केला होता. Baijnath Aggarwal Trustee of Gita Press passes away Chief Minister Yogi expressed his condolences

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी (२८ ऑक्टोबर) बैजनाथ अग्रवाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “गीता प्रेस, गोरखपूरचे विश्वस्त बैजनाथ अग्रवाल यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. गीता प्रेसचे विश्वस्त म्हणून गेली ४० वर्षे, बैजनाथ यांचे जीवन सामाजिक जागृती आणि मानव कल्याणासाठी समर्पित होते. त्यांच्या निधनाने समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. भगवान श्री राम दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना आणि संपूर्ण गीता प्रेस परिवाराला हे अपरिमित दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.”

गीता प्रेसला सांस्कृतिक मंत्रालयाने 2021 मध्ये गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित केले आहे. ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “गीता प्रेस ही जगातील एकमेव प्रिंटिंग प्रेस आहे, जी केवळ एक संस्था नाही तर एक जिवंत श्रद्धा आहे. गीता प्रेसचे कार्यालय कोट्यवधी लोकांसाठी मंदिरापेक्षा कमी नाही.”

Baijnath Aggarwal Trustee of Gita Press passes away Chief Minister Yogi expressed his condolences

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात