विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बदलापुरातील आदर्श शाळेत badlapur school case शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला. संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटले. गेल्या 6 ते 7 तासांपासून बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन सुरु आहे. या घटनेला आता हिंसक वळण लागले. आता बदलापूरच्या घटनेचे थेट दिल्लीत पडसाद उमटले. या प्रकरणाची राष्ट्रीय बालक आयोगाने दखल घेतली आहे. Badlapur
बदलापुरात दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून एक पथक बदलापूरला पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी सांगितले.
Supreme Court : केंद्राने सुप्रीम कोर्टाला म्हटले तीन तलाक घातक, मुस्लिमांनी हे थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत
राष्ट्रीय बाल हक्क आयोग काय म्हणाले?
बदलापूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार badlapur school case झाल्याची अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. केंद्र सरकारने निर्मित केलेल्या राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासाठी आयोगाकडून एक तपास पथक बदलापूर येथे पाठवण्यात येणार आहे. हे पथक या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करेल. तसेच पोलिसांनी पीडितेच्या पालकांना तक्रार नोंदवण्यासाठी 12 तास थांबवले, ही धक्कादायक बाब आगहे. याप्रकरणी राज्य शासनाकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे, अशी माहिती माहितीही प्रियांक कानगो यांनी दिली.
तसेच राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून पाठवण्यात येणाऱ्या या समितीवर माझेही लक्ष असेल. तसेच याप्रकरणी सहभागी असलेल्या सर्व दोषी पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा होईल. त्यासोबतच याप्रकरणाची सखोल चौकशी आम्ही देखील करणार असल्याचे प्रियांक कानगो म्हणाले.
नेमंक काय घडलं?
बदलापूर badlapur school case पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या प्रकरणानतंर पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर तक्रार नोंदवण्यात आली.
यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीला अटक केली. अक्षय शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. तो 24 वर्षांचा असून या शाळेतील सफाई कर्मचारी म्हणून तो काम करत होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App