अयोध्येने स्वतःचाच विश्वविक्रम मोडला, राम की पैडीवर एकाच वेळी २२ लाख दिवे झाले प्रज्वलित!

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर अयोध्येत दीपोत्सव साजरा

विशेष प्रतिनिधी

अयोध्या : दिवाळीनिमित्त अयोध्येत भव्य दिपोत्सव आयोजित करण्यात आला होता. रामाची नगरी २२ लाखाहून अधिक दिव्यांनी उजळून निघाली होती. यामुळे अयोध्येने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित करणार आहे. Ayodhya broke its own world record 22 lakh lights were lit simultaneously on Ram Ki Padi

प्रभू रामाची नगरी असलेल्या अयोध्येने दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव सोहळ्यात एकाच वेळी 51 घाटांवर सुमारे 22.23 लाख मातीचे दिवे प्रज्वलित करून ही कामगिरी केली. 2017 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यावर्षी सुमारे 51,000 दिवे लावले गेले आणि 2019 मध्ये ही संख्या 4.10 लाख झाली.

2020 मध्ये 6 लाखांहून अधिक मातीचे दिवे आणि 2021 मध्ये 9 लाखांहून अधिक मातीचे दिवे लावले गेले. 2022 मध्ये राम की पैडीच्या घाटांवर 17 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. तथापि, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने केवळ पाच मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ प्रज्वलित राहिलेल्या दिव्यांचा विचार केला आणि 15.76 लाखांचा विक्रम नोंदवला गेला.

Ayodhya broke its own world record 22 lakh lights were lit simultaneously on Ram Ki Padi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub